मराठी आणि हिंदी सिनेविश्वातील अभिनेते आशिष वारंग यांचे ५ सप्टेंबर रोजी निधन झाले. 'सूर्यवंशी', 'सर्कस' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झालं आहे. मराठी-हिंदी सिनेविश्वातून गाजलेले अभिनेते आशिष वारंग यांचे निधन झाले. 'सूर्यवंशी', 'सर्कस', 'मर्दानी', 'सिंबा', 'एक व्हिलन रिटर्न्स' अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या सहाय्यक भूमिका विशेष चर्चेत आल्या होत्या. त्यांनी केलेल्या भूमिका चर्चेत राहिल्या.
आशिष यांनी कोणासोबत काम केलं?
हिंदी सिनेमासह मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. ५ सप्टेंबर आजच त्यांचे निधन झालं आहे. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांचं निधन झालं असून सोशल मीडियावर माध्यमातून अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. आशिष यांनी अमिताभ बच्चन, आमिर खान, राणी मुखर्जी, अजय देवगण, अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग, आशुतोष राणा, रोहित शेट्टी, जॉन अब्राहम अशा अनेक आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले आहे.
सोशल मीडियावर फोटो केले शेअर
सर्वांसोबत सोशल मीडियावर त्यांनी फोटो शेअर केले आहेत. त्यांनी विविध ठिकाणी पोलिसाची भूमिका निभावली आहे. आशिष यांनी मराठी मराठी-हिंदीतील विविध जाहिरातींमध्येही झळकले होते. आशिष यांच्या निधनानंतर अवघ्या सिनेविश्वातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि ५ सप्टेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
मराठी मनोरंजन सृष्टी दुःखाच्या सावटामध्ये
मराठी मनोरंजन सृष्टीवर दुःखाचे सावट कोसळले आहे. काही दिवसांपूर्वी ३१ ऑगस्ट रोजी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन झालं आहे. १८ ऑगस्ट रोजी अभिनेत्री प्रिया मराठेच निधन झालं आहे. १८ ऑगस्ट रोजी जेष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांनी या जगाचा निरोप घेतलेला, तर त्यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आता आशिष यांच्या निधनाचे वृत्त येऊन धडकल्याने मराठी सिनेविश्व पुन्हा एकदा शोकाकुल झाले आहे.
