- Home
- Entertainment
- Drishyam 3 Box Office : 'दृश्यम ३' ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग, पहिल्याच दिवशी अजय देवगण करणार मोठी कमाई!
Drishyam 3 Box Office : 'दृश्यम ३' ची बंपर ॲडव्हान्स बुकिंग, पहिल्याच दिवशी अजय देवगण करणार मोठी कमाई!
'दृश्यम ३: द कन्क्लूजन' अखेर थिएटरमध्ये रिलीज झालाय. अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.

दृश्यम-३ सिनेमा
अभिषेक पाठकने दिग्दर्शित केलेला 'दृश्यम ३: द कन्क्लूजन' शुक्रवार, २ ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झालाय. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. ट्रॅकर सॅकनिल्कच्या (Sacnilk) रिपोर्टनुसार, 'दृश्यम ३' ने आतापर्यंत १,२१० शोजमधून भारतात २.८५ कोटी रुपयांची नेट कमाई केलीय. यावेळी ३२% ऑक्युपन्सी दिसली. सध्या चित्रपटाचं भारतातील ग्रॉस कलेक्शन ३.३६ कोटी रुपये आहे.

अॅडव्हान्स बुकिंग
थिएटरमध्ये पोहोचण्यापूर्वीच चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमधून तगडी कमाई केलीय. ब्लॉक केलेल्या सीट्ससह 'दृश्यम ३' ने भारतात ६०.१७ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलंय. ब्लॉक सीट्स वगळता हा आकडा ४९.२९ कोटी रुपये आहे. ५१,५७० शोजसाठी तब्बल १८.०२ लाख तिकीटं विकली गेली आहेत. शुक्रवारी ॲडव्हान्स बुकिंगमधून सर्वाधिक ३१.६५ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन झालंय. ब्लॉक सीट्स वगळता १६,१२५ शोजमधील ८.८२ लाख तिकिटांमधून २७.९२ कोटी रुपये मिळाले आहेत.
प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद
ओपनिंग वीकेंडलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने शनिवारसाठी १४.७७ कोटी आणि रविवारसाठी ११ कोटी रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग केलंय. सोमवारसाठी ९३.८७ लाख, मंगळवारसाठी ९१.८८ लाख आणि बुधवारसाठी ८६.३७ लाख रुपयांचं बुकिंग झालंय. १ ऑक्टोबरच्या प्रीमियरने ८४ शोजमधून ३.१८ लाख रुपये कमावले. तर बुधवार, ७ ऑक्टोबरसाठी १,८९८ शोजमधून ५२,६०६ तिकीटं विकली गेली असून ॲडव्हान्स ऑक्युपन्सी १२% आहे.
दृश्यम सिनेमाचा सिक्वल
'दृश्यम ३: द कन्क्लूजन' हा हिंदी दृश्यम फ्रँचायझीचा तिसरा आणि शेवटचा भाग आहे. अजय देवगण यात पुन्हा विजय साळगावकर बनलाय. मूळ कथा मल्याळम 'दृश्यम'ची असली, तरी हिंदीतील हा तिसरा भाग मल्याळमपेक्षा वेगळ्या वळणावर जातो. आतापर्यंत प्रेक्षकांनी कलाकारांचा अभिनय, सस्पेन्स आणि क्लायमॅक्सचं खूप कौतुक केलंय. ॲडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता, वीकेंडला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

