गुपचूप उदयपूरमध्ये बॉयफ्रेंड सोबत लग्न उरकवणाऱ्या तापसी पन्नूची संपत्ती किती माहित आहे का ?

| Published : Mar 27 2024, 02:56 PM IST / Updated: Mar 27 2024, 02:58 PM IST

Taapsee Pannu

सार

गेल्या दोन दिवसांपासून तापसी पन्नू आणि तिचा कथित बॉयफ्रेंड यांचा विवाह उदयपूर येथे झाला अशा चर्चा रंगल्या आहेत. कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिने बॉलीवूड मध्ये आपली वेगळी छाप निर्माण केली आहे, जाणून घेऊया तिची संपत्ती किती आहे.

एंटरटेनमेंट डेस्क: तापसी पन्नू बॉलिवूड मधील उत्तम अभिनेत्री असून वेगळ्या भूमिकांमुळे कायम चर्चेत असते. तिने साकारलेल्या अभिनयच ठसा हिंदी चित्रपट सृष्टीत उमटला आहे.‘थप्पड’, ‘बदला’, ‘गेम ओव्हर’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाने तिने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अभिनयापलीकडे, तापसीने गेल्या वर्षी निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं.सध्या तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोईबरोबर लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान तापसीची जीवनशैली, प्रवास, मालमत्ता, संपत्ती याबद्दल जाणून घेऊयात.

आलिशान घर

तापसी पन्नू आणि तिची बहीण शगून यांचं ‘पन्नू पिंड’ नावाचं 3bhk मॉडर्न घर आहे. हे आलिशान घर अंधेरीत असून याचं डेकोर आधुनिक आणि विंटेज पद्धतीने केलं आहे. ट्रायबल प्रिन्ट्स, महाराजा स्टाईलचे पलंग आणि अनोखी सजावट असणारे हे घर तब्बल १० कोटींचं आहे.

कार कलेक्शन

तापसी पन्नूच्या गॅरेजमध्ये आलिशान गाड्या आहेत. मर्सिडीज GLE 250D, जीप कंपास, BMW 3-Series GT, BMW X1, आणि Audi A8L असं कार कलेक्शन तापसी पन्नूकडे आहे. या सगळ्याची एकत्रित किंमत लाखो रुपये आहे.

अभिनय आणि निर्मिती क्षेत्र

निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत तापसीने उद्योग क्षेत्रातील दिग्गज प्रांजल खंडडिया यांच्या सहकार्याने ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ची स्थापना केली. ‘सुपर 30’ आणि ‘पिकू’सारख्या चित्रपटांचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओसह, हा उपक्रम तिच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा ठरला.

गुंतवणूक आणि क्रीडा आवड

मनोरंजन क्षेत्राच्या पलीकडे, प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये पुणे सेव्हन एसेस संघाची मालकी घेऊन तापसी पन्नूने तिची उद्योजकता दाखवली. खेळातील तिचा सहभाग तिची बहुआयामी रूची आणि धोरणात्मक गुंतवणूक दर्शवतो.

आणखी वाचा :

मुंबईतील हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 'बिग बॉस- 17' विजेता मुनव्वर फारूकीचा समावेश\

कमल हसन यांच्या 3 बिग बजेट तामिळ चित्रपटांचे जाणून घ्या अपडेट...

शाहरुख खान सिनेमात तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार होता, या कारणास्तव झाली एक्झिट