रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. फक्त ४ दिवसांत सिनेमाने ४६६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एका दिवसात १२१ कोटी कमावून या सिनेमाने नवा विक्रम रचला असून तो २०२६ मधला सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला आहे. 

Dhurandhar The Revenge 10 Major Records: 'धुरंधर २' ने भारतीय बॉक्स ऑफिसवर एक नवीन इतिहास घडवला आहे. आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह स्टारर या स्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमाने एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. फक्त ४ दिवसांत या सिनेमाने ४०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री केली असून आता तो २०२६ मधला सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. या सिनेमाने सनी देओलच्या 'बॉर्डर २' लाही मागे टाकलं आहे.

ओपनिंग वीकेंड कलेक्शन: चौथ्या दिवशीही जबरदस्त कमाई

अधिकृत आकडेवारीनुसार, सिनेमाने चौथ्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून १२१ कोटी रुपयांची नेट कमाई केली. सलग दुसऱ्या दिवशी सिनेमाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शनिवारी ११७ कोटींची कमाई केल्यानंतर, रविवारी सिनेमाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ दिसून आली. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या शानदार प्रतिसादाचा थेट परिणाम थिएटरमधील वाढत्या गर्दीच्या रूपात दिसत आहे.

४ दिवसांचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन

ओपनिंग वीकेंडनंतर सिनेमाचं एकूण नेट कलेक्शन ४६६ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

दिवसनिहाय कमाई (नेट कलेक्शन)

  • पहिला दिवस: १४५ कोटी (पेड प्रिव्ह्यूसह)
  • दुसरा दिवस: ८३ कोटी
  • तिसरा दिवस: ११۷ कोटी
  • चौथा दिवस: १२१ कोटी
  • एकूण: ४६६ कोटी रुपये

बजेट आणि नफा (ROI Analysis)

या सिनेमाचं बजेट जवळपास २२५ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.

एकूण कमाई: ४६६ कोटी

नफा (ROI): २४१ कोटी

नफ्याची टक्केवारी (ROI %): जवळपास १०७%

ओपनिंग वीकेंडमधील 'धुरंधर २' चे १० मोठे विक्रम

रणवीर सिंहच्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडले आहेत.

१- बॉलिवूड सिनेमासाठी सर्वाधिक ॲडव्हान्स बुकिंग.

२- भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक पेड प्रिव्ह्यू.

३- बॉलिवूडमधील सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड.

४- भारतीय सिनेसृष्टीतील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग वीकेंड ('पुष्पा २' नंतर).

५- सर्वात वेगाने ३०० कोटी कमावणारा सिनेमा.

६- सर्वात वेगाने ४०० कोटी कमावणारा सिनेमा.

७- एका दिवसात सर्वाधिक कमाई (१२१ कोटी).

८- पहिल्या शनिवारी सर्वाधिक तिकीट विक्री.

९- बुक माय शोवर प्रति तास सर्वाधिक तिकीट विक्री (१०९.१७ हजार).

१०- २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सिनेमा.

चौथ्या दिवसानंतरची बॉक्स ऑफिस स्थिती

  • बजेट: २२५ कोटी
  • भारतातील नेट कलेक्शन: ४६६ कोटी
  • भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन: ५४९.८८ कोटी