रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या 'रामायण' सिनेमातल्या 'मंगल रंग' आणि 'जुडी जोडी' या गाण्यांवर प्रेक्षक नाराज झाले आहेत. गाण्यातली कव्वाली शैली, हळदीच्या सीन्सचं व्हिज्युअल आणि मुख्य कलाकारांमधल्या केमिस्ट्रीत वाटणारी 'फील'ची कमतरता यामुळे नेटकऱ्यांनी या गाण्यांना चांगलंच ट्रोल केलंय.
आगामी रामायण सिनेमातली 'मंगल रंग' आणि 'जुडी जोडी' ही दोन गाणी सध्या खूप चर्चेत आहेत. पण या गाण्यांनी भारतीय प्रेक्षकांचा हिरमोड केलाय. प्रचंड उत्सुकता असतानाही या गाण्यांचं म्युझिक, व्हिज्युअल्स आणि ओव्हरऑल फील लोकांना फारसा भावलेला नाही.
सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत आहे, तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारतेय. ए. आर. रहमान आणि हॅन्स झिमर यांनी या गाण्यांना संगीत दिलंय, तर श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांनी ती गायली आहेत. या पौराणिक महाकाव्याबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण करण्यासाठी मेकर्सनी ही गाणी रिलीज केली होती.
संगीतावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया
सोशल मीडियावर एका युझरने खरमरीत कमेंट केलीय, "वाल्मिकी रामायणात सूफी कव्वालीचे बीट्स टाकणं हा बॉलीवूडचा सगळ्यात मोठा भ्रम आहे." 'मंगल रंग' गाण्याच्या म्युझिकल स्टाईलवर अनेक चाहत्यांनी आक्षेप घेतलाय. पौराणिक कथेमध्ये अशा प्रकारचा 'कव्वालीसारखा' टोन अजिबात पटत नसल्याचं लोकांनी म्हटलंय. दुसऱ्या एका युझरने तर थेट लिहीलंय, "रामायणात कव्वाली? ए. आर. रहमान नेहमीच निराशा करतो." काही लोकांनी या गाण्याची तुलना रहमान यांच्या 'रॉकस्टार'मधील 'कुन फया कुन' आणि तमिळ गाणं 'एंना सोल्ला पोगिराई'शी केली आहे.
एवढंच नाही तर...
दुसरीकडे 'जुडी जोडी' या गाण्यानेही प्रेक्षकांची निराशाच केलीय. राम आणि सीता यांच्यातील केमिस्ट्री अजिबात नॅचरल वाटत नसल्याचं अनेकांनी म्हटलंय. काही युझर्स म्हणाले, "या गाण्यात तो फीलच नाहीये." तर काहींच्या मते "ॲनिमेशन अगदी कार्टूनसारखं दिसतंय." तुम्हीच पाहा यावरच्या काही युझर कमेंट्स!


सिनेमाच्या इमोशनल फीलचं काय?
लॉस एंजेलिसमधील वर्ल्ड प्रीमियमधून समोर आलेल्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या मुद्द्यावर मोठी चिंता दिसतेय. चित्रपटाचा भव्य स्केल आवडला असला तरी, रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या पात्रांमध्ये पडद्यावर तो 'दिव्य प्रभाव आणि भावूकता' दिसली नाही, असं काही प्रेक्षकांचं मत आहे. एका समीक्षकाने लिहिलंय की, भारतीय आणि हॉलीवूड संगीताचं हे फ्युजन बऱ्याच ठिकाणी 'उलटंच अंगलट आलंय'. कारण या कथेला एका दिव्य संगीताच्या जोडची गरज आहे.
५ नोव्हेंबर २०२६ रोजी हा सिनेमा जगभरात रिलीज होतोय. या रामायण सिनेमाकडून लोकांच्या खूप जास्त अपेक्षा आहेत, पण सध्या तरी या गाण्यांवरून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय.




