Big Boss 19: लोकप्रिय स्पर्धक आवेज दरबार बिग बॉस १९ मधून बाहेर पडला आहे. प्रचंड फॅन फॉलोविंग असूनही, प्रेक्षकांची पुरेशी मतं न मिळाल्याने आणि कमकुवत खेळामुळे त्याला शोमधून एलिमिनेट करण्यात आले.
बिग बॉस शो आवडीने पाहणारे अनेक प्रेक्षक आहेत. ते नेहमेतपणे हा शो आवर्जून पाहत असतात. या स्पर्ध्येमधून एक नाव बाहेर गेल्याची माहिती समोर आल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे. या गेममधून एक लोकप्रिय स्पर्धक बाहेर पडला असून त्याची जबरदस्त फॅन फॉलोविंग होती. आवेज दरबाजला या कार्यक्रमातून काढून टाकण्यात आलं आहे.
प्रेक्षकांची मत न मिळाल्यामुळं काढून टाकलं
प्रेक्षकांची मत न मिळाल्यामुळे आवेजला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं आहे. बिग बॉस १९ च्या स्पर्धेतून त्याला एलिमिनेट करण्यात आल्याची माहिती समजली आहे. बिग बॉस १९ च्या विकेंड का वारमध्ये त्याला मत न मिळाल्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. निर्मात्यांकडून मात्र याबाबतची कोणतीही माहिती दिली नाही.
भांडणामुळे आवेज आला चर्चेत
भांडणामुळे आवेज दरबाज हा कायमच चर्चेत येत होता. त्याची तंगडी फॅन फॉलोविंग असूनही त्याला कार्यक्रमातून बाहेर काढून टाकण्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये संपूर्ण ग्रुप नॉमिनेट झाला होता. यामध्ये अशनूर कौर, गौरव खन्ना, आवेज दरबार, मृदुल तिवारी, नीलम गिरी आणि प्रणित मोरे यांचा समावेश होता. या सर्व स्पर्धकांचा चाहता वर्ग खूप मोठी आहे.
कमकुवत खेळामुळे चाहत्यांनी मते दिली नाही
कमकुवत खेळामुळे चाहत्यांनी आवेजला मतदान केलं नाही. त्यामुळं त्याला या स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं. त्याला स्पर्धेमधून बाहेर काढण्यात आलं असून अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. आवेज दरबार हा बिग बॉस 19 मधील त्या स्पर्धकांपैकी एक आहे, ज्याची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 30 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.त्याचबरोबर, यूट्यूबवरही त्याचे 12.6 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. इतका मोठा चाहता वर्ग, फॉलोअर्स असूनही, त्याला प्रेक्षकांची मते मिळवण्यात यश आलं नाही.
सलमान खानने काय आठवण करून दिली?
सलमान खानने त्याला अनेक वेळा आठवण करून दिली होती, त्यानं काही केलं नाही तर तो शोमधून बाहेर पडेल असं सांगण्यात आलं होत. नगमा मिराजकर ज्याप्रमाणे शोमधून बाहेर पडली होती, त्याचप्रमाणे आवेजलाही बाहेर पडावं लागेल, असं सलमाननं म्हटलं होतं. तो चांगला खेळत नसल्याबद्दल त्यानं अनेकवेळा सांगितलं होतं.


