Bollywood : 'दबंग' सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप सध्या सलमान खानवर चिखलफेक करत आहेत आणि आता त्यांनी शाहरुख खानलाही लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.  

Bollywood : सलमान खानवर सतत आरोप करणारे चित्रपट निर्माते अभिनव कश्यप अजूनही शांत नाहीत आणि सतत खुलासे करत आहेत. नुकतंच त्यांनी शाहरुख खानबद्दल भाष्य केलं. 'दबंग'च्या दिग्दर्शकाने म्हटलं की, शाहरुख फक्त घेतो आणि समाजासाठी खूप कमी योगदान देतो. इतकंच नाही तर त्यांनी शाहरुखला दुबईला जाण्याचा विचार करण्याचा सल्लाही दिला. 'बॉलिवूड ठिकाना'ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत कश्यप यांनी असाही दावा केला की, त्यांना शाहरुखची अनेक रहस्ये माहीत आहेत, पण ते सांगणार नाहीत.

शाहरुख खानबद्दल काय म्हणाले अभिनव कश्यप

अभिनव कश्यप म्हणाले - "माझा राग सर्वांवर आहे आणि ही माझी स्वतःची विचारसरणी आहे. इंडस्ट्रीमध्ये जो नॅरेटिव्ह पसरवला आहे, तो असा आहे की एक चित्रपट हिरोमुळे चालतो आणि एक फ्लॉप चित्रपट दिग्दर्शकामुळे होतो. हा नॅरेटिव्ह तोडणं खूप गरजेचं आहे, ज्याला मी जिहादी मानसिकता म्हणतो." दिग्दर्शकाने कबूल केलं की त्यांनी शाहरुखसोबत बरीच चर्चा केली आहे आणि आमिरसोबत कामही केलं आहे. तिघांची विचारसरणी सारखीच आहे. ते म्हणाले - “सलमान गुंड आहे, शिवीगाळ करतो पण शाहरुख तसं करत नाही. शाहरुखची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्याला नेहमी कोणाचीतरी कल्पना घ्यायची असते. मी त्याला जो चित्रपट सादर केला होता, तो यासाठी बनला नाही कारण त्याला तो 'रेड चिली एंटरटेनमेंट'च्या बॅनरखाली बनवायचा होता, जेणेकरून तो त्यावर नियंत्रण ठेवू शकेल. माझी इच्छा होती की त्याने फक्त एक हिरो बनावं, फी घ्यावी आणि शांतपणे अभिनय करावा.”

शाहरुख खानची रहस्ये उघड करू शकतो - अभिनव कश्यप

अभिनव कश्यप पुढे म्हणाले - शाहरुख खानच्या कुटुंबाच्या आदरापोटी काही गोष्टी सांगत नाहीये. "मला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप काही माहीत आहे, पण मी सांगणार नाही कारण मला त्याच्या कुटुंबात फूट पाडायची नाही. तो एक फॅमिली मॅन आहे, म्हणून मी शांत आहे. मला आशा आहे की तो गोष्टी सुधारेल आणि तोच शाहरुख बनेल जो तो मुंबईत हिरो बनायला आला होता." कश्यप यांनी सांगितलं - “शाहरुखने माझ्या आणि सलमानमध्ये समेट घडवून आणण्याचा खूप प्रयत्न केला. त्याने मला अनेकदा विचारलं की काय प्रॉब्लेम आहे, कशाबद्दल बोलायचं आहे. पण मी त्याला त्यावेळी या प्रकरणापासून दूर राहायला सांगितलं. त्यामुळे त्याच्याबद्दल काही विचारू नका, सोडून द्या त्याला.”