बॉलिवूडमध्ये गणेशोत्सवाची धूम, सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, बघा PHOTOS
मुंबई- गणेश चतुर्थी निमित्त सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच बाप्पाच्या रंगात रंगले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपल्या घरी गणपतीची स्थापना केली आहे आणि त्यांच्या घरातील गणपतीच्या मूर्तींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गोविंदाच्या घरी बाप्पा
घटस्फोटाच्या बातम्या रंगलेल्या असताना गोविंदा, पत्नी सुनीता आणि कुटुंब गणेश चतुर्थी साजरी करताना दिसले. यामुळे त्यांच्या लग्नातील विघ्न दूर झाल्याचे दिसून आले.
अनन्या पांडेचा बाप्पा
अनन्या पांडेनेही घरी बाप्पाची स्थापना केली आणि सुंदर सजावट केली. यावेळी चंकी पांडे आणि त्यांची पत्नीही सोबत होती. अनन्याने पांढरा आकर्षक ड्रेस घातला होता.
हेमा मालिनींचा बाप्पा
हेमा मालिनींनीही घरी गणपतीची स्थापना केली आणि पूजा केली. ईशा देओलही यावेळी उपस्थित होती. हेमा यांनी पिवळा तर ईशाने निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. दोघी खूप सुंदर दिसत होत्या.
करीना कपूरचा बाप्पा
करीना कपूरनेही दरवर्षीप्रमाणे यंदाही घरी गणपतीची स्थापना केली. तिच्याकडे पर्यावरण पूरक बाप्पा असल्याचे दिसून आले. फोटोत बाप्पाची मूर्ती फारच सुबक दिसत आहे.
जॅकलिनचा गणेशोत्सव
जॅकलिन फर्नांडिसनेही घरी गणपतीची स्थापना केली आणि सुंदर सजावट केली. तिच्या बाप्पानेही लक्ष वेधून घेतले. आयुष्यातील सर्व विघ्न दूर व्हावेत अशी तिने प्रार्थना केली.
सोनू सूदचा बाप्पा
सोनू सूद दरवर्षी घरी गणपतीची स्थापना करतात आणि सुंदर सजावट करतात. यावेळी ते सहकुटुंब दिसले. त्यांनी भगव्या रंगाचा बाप्पा बसवलेला आहे.
तुषार कपूरचा बाप्पा
तुषार कपूरनेही घरी गणपतीची स्थापना केली. त्यांनी मुलगा लक्ष्यसोबत फोटो काढले. यावेळी तूषारने पांढरे धोतर घातले होते.

