- Home
- Entertainment
- Bigg Boss Marathi विजेता सूरज खरंच लग्न करतोय? कोण आहे ती मुलगी? अंकिता वालावलकरचे काय कनेक्शन?
Bigg Boss Marathi विजेता सूरज खरंच लग्न करतोय? कोण आहे ती मुलगी? अंकिता वालावलकरचे काय कनेक्शन?
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी सीझन 5' चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. त्याची बिग बॉसमधील बहीण अंकिता वालावलकरच्या पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अंकिता वालावलकरचा खुलासा
गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस' विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. आता सूरजची बिग बॉसमधील बहीण अंकिता वालावलकरने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बिग बॉस विजेता
टिकटॉक स्टार सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी सीझन 5' मध्ये भाग घेतला होता आणि आपल्या साधेपणाने त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे त्याला विजेता घोषित करण्यात आले होते.
अंकिताची पोस्ट
बिग बॉसच्या घरात सूरज रील स्टार अंकिता वालावलकरला आपली बहीण मानत होता. आता अंकिताने सूरजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्याचे कुणासोबत तरी लग्न होत असल्याचे सांगितले आहे.
तो खरंच लग्न करतोय?
गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाची चर्चा होती. त्याने प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. पण तो खरंच लग्न करतोय का? यावर चर्चा सुरू झाली होती.
दक्षिण भारतीय मुलगी कोण?
सूरजने इंस्टाग्रामवर दक्षिण भारतीय पोशाखातील मुलीसोबतचा फोटो शेअर केला. त्याने फक्त हार्ट इमोजी वापरल्याने, त्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. या फोटोत मुलीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे तिची ओळख पटत नाही.
ती लग्नाला येणार नाही
अंकिता वालावलकरने सूरजच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे. 'सूरजला शुभेच्छा! हे गिफ्ट आहे कारण मला वाटतं मी लग्नाला येऊ शकणार नाही,' असं तिने लिहिलं आहे.
कोण आहे ती?
आता सूरजच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. तो कोणत्या मुलीशी लग्न करणार आहे? आणि लग्न कधी करणार? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

