अर्शद वारसीचा गोव्यात आहे 150 वर्ष विंटेज बंगला, बघा डोळ्यांत भरणारे Inside Look
Arshad Warsi Goan Bungalow : अभिनेता अर्शद वारसी, जो त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो, त्याचा गोव्यात एक १५० वर्ष जुना पोर्तुगीज-शैलीचा बंगला आहे. या बंगल्यात उंच छत, जुन्या पद्धतीच्या खिडक्या आणि एक सुंदर बाग आहे, जिथे तो कुटुंबासोबत आराम करतो.

अर्शद वारसीचा १५० वर्ष जुना पोर्तुगीज बंगला
अर्शद वारसीचा गोव्यातील १५० वर्ष जुना पोर्तुगीज बंगला खूपच आकर्षक आहे. यात विंटेज इंटिरियर, उंच छत आणि एक शांत बाग आहे, जिथे अभिनेता आपल्या कुटुंबासोबत शांतपणे वेळ घालवतो. त्याला हा बंगला खूप आवडतो. निवांत असला की तो या बंगल्यात येऊन राहतो. कुटुंब नसले तरी तो एकटा येऊन येथे राहतो.
बंगल्याची सुंदर पोर्तुगीज वास्तुकला
अर्शद वारसीच्या १५० वर्ष जुन्या गोवा बंगल्यात पोर्तुगीज वास्तुकलेची सुंदर झलक दिसते. उंच छत, जुन्या खिडक्या आणि शांत बाग यामुळे घराला एक वेगळाच लुक येतो. हा बंगला एक वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. त्याचा रॉयल फील सुट्यांच्या आनंद द्विगुणीत करतो.
बाल्कनीत बसून निसर्गाचा आनंद
अर्शद वारसी आणि त्याची पत्नी अनेकदा त्यांच्या बंगल्याच्या बाल्कनीत बसून गोव्याच्या सुंदर दृश्यांचा आणि शांत वातावरणाचा आनंद घेतात. हे घर एक खरं 'कोस्टल रिट्रीट' आहे. त्यांचा हा फोटो नेहमेच व्हायरल होतो. त्याच्या पत्नीलाही येथे राहायला खूप आवडते.
घरात एक आलिशान स्विमिंग पूल
अर्शद वारसीच्या १५० वर्ष जुन्या गोवा बंगल्यात एक आलिशान स्विमिंग पूल आहे, जो या हेरिटेज घराला एक रॉयल टच देतो. यामुळे जुन्या सौंदर्यात आधुनिकतेचा मिलाफ दिसतो. तो अगदी बंगल्याच्या मधोमध आहे.
बंगल्यातील सुंदर आणि आकर्षक बेडरूम
बंगल्याचा सुंदर सजवलेला बेडरूम आरामदायक आणि आकर्षक आहे. क्लासिक लाकडी फर्निचर, मंद प्रकाश आणि विंटेज सजावट घराच्या पोर्तुगीज शैलीला पूर्णपणे पूरक आहे. येथे आल्यावर प्रचंड फ्रेश वाटते.
अर्शदला पेंटिंगची खूप आवड आहे
अर्शद वारसीची पेंटिंगची आवड त्याच्या घराच्या सजावटीत स्पष्ट दिसते. त्याच्या गोवा बंगल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात सुंदर कलाकृती आणि क्रिएटिव्ह टचमुळे एक वेगळेच आकर्षण आहे. या बंगल्यातील पेंटिंग आपल्या नजरेत भरतात.
डायनिंग एरियामध्ये निसर्गावर आधारित पेंटिंग्स
अर्शद वारसीच्या बंगल्याचा डायनिंग एरिया निसर्ग-थीम असलेल्या पेंटिंग्जने सजवला आहे. यामुळे एक शांत आणि प्रसन्न वातावरण तयार होते, जे घराच्या पोर्तुगीज शैलीला शोभून दिसते. हा खुपच देखणा बंगला आहे.

