सोशल मीडियावर दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांच्या चाहत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. आलियाने एका ब्रँडचा प्रचार केल्यामुळे, ज्याचा प्रमुख चेहरा दीपिका होती, त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
सोशल मीडिया कलाकारानं ट्रोल केलं जात, सोशल मीडियावरून कलाकारांचे फॅन एकमेकांना भिडत असतात. आता दीपिका पदुकोण आणि आलीय भट्ट हा त्यांच्या चाहत्यांमध्ये अशीच जुंपली आहे. ही काही पहिली वेळ नसून आलिया आणि दीपिका यांच्या फॅन्समध्ये सोशल मीडियावर वार सुरु झाला आहे. या दोघींमधील वाद हा कायमच सोशल मीडियावर दिसून येत असतो.
दोघींच्या फॅन्सने काय आरोप केले?
अनेकदा आलियानं दीपिकाचा लुक कॉपी केला असं म्हणत तिला ट्रोल केलं जातं तर, आलियाच्या सिनेमावेळी दीपिका मुद्दाम काही तरी घोषणा करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते...असा आरोपही चाहते करत असतात. आता परत एकदा या दोघींच्या चाहत्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झाला आहे. त्यामुळं दोघींच्या फॅन्सकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.
वादाचे कारण काय आहे?
आलिया आणि दीपिका या दोघींमध्ये जरी वाद नसला तरी त्यांचे चाहते एकमेकांवर आरोप करत असतात. आलिया आणि दीपिका या दोघींच्या चाहत्यांमध्ये वार सुरु होण्याला एक जाहिरात प्रमुख कारण ठरली आहे. आलिया भटने एक फोटो पोस्ट केला असून या ब्रँडचा प्रमुख चेहरा दीपिका होती, त्यामुळं आता यावरून वाद सुरु झाला आहे.
दोघींच्या चाहत्यांनी वाद का घालायला सुरुवात केली?
दोघींच्या चाहत्यांनी आता भांडायला सुरुवात केली आहे. दोघींचा आता चाहतावर्ग असून भविष्यात त्यांचे बिग बजेट चित्रपट येणार आहे. या भांडणांमध्ये दोघी पडतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील आहे. आगामी भविष्यकाळात दोघीही मोठे चित्रपट करणार असून आलियाच्या हाती 'अल्फा' आणि 'लव्ह अँड वॉर' हे चित्रपट आहेत, तर दीपिका अल्लू अर्जुनसोबत अॅटलीच्या सिनेमात दिसणार आहे. शाहरुखच्या 'किंग' सह तिच्या हाती आणखी एक बिग बजेट चित्रपट असल्याचं कळतंय. हा चित्रपट 'कल्की'चा सिक्वेल असण्याचीही शक्यता आहे.
