अभिनेते वैभव मांगले यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्येवर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात की, रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट असून, प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

मुंबई: कोकणवासी दरवर्षी गावाकडं जात असताना रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल बोलत असतो. दरवर्षी रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यामुळं वाहन चालवताना होणार तारांबळ यामुळं कोकणवासीयांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्यांबद्दल अभिनेते वैभव मांगले यांनी राग व्यक्त केला आहे.

वैभव काय म्हणाला? 

'गेली १७ वर्षं आपण रस्ता चांगला होण्याची जी वाट पाहतोय, तो आता होण्याच्या मार्गावर आहे. मी आजच देवरुखला आलो. माणगांवच्या आसपासचा, चिपळूण, संगमेश्वर येथील रस्ता अजून होणे बाकी आहे.''माणगाव, संगमेश्वर येथे तर भीषण अवस्था आहे, तो रस्ता कधी होईल किंवा होईल की नाही हेही सांगता येत नाही. आजूबाजूला घनदाट वस्ती आहे, त्यातून ते कसा मार्ग काढणार आहेत कुणास ठाऊक.

पण बाकी रस्ता झाला आहे आणि तो चांगला आहे. सावकाश या. घाई करू नका. विरुद्ध दिशेने गाड्या चालवू नका. चुकीच्या पद्धतीनं गाडी ओव्हरटेक करू नका, त्यानं वाहतूक अजून अवघड होते. शुभ यात्रा' असं यावेळी अभिनेते वैभव मांगले यांनी लिहिलं आहे. त्यांनी वाहनचालकांना गाडी सावकाश चालवण्याची सूचना आवर्जून केली आहे.

कोण आहे वैभव मांगले?

 वैभव मांगले हा मराठी अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता असून त्यानं अनेक गाजलेल्या नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यानं केलेल्या अनेक भूमिकांचे प्रेक्षकांनी कौतुक केलं. 'स्टार प्रवाह' वाहिनीवर सुरू असलेल्या 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेमध्येही दिसत आहेत. वैभवच्या पोस्टमुळे कोकणवासीय जागरूक होतील अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही.