बॉलिवूडमधील एका अभिनेत्याने त्याच्या एक्स बायकोला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आठ वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर, हा अभिनेता आणि त्याची एक्स बायको पुन्हा एकत्र आले आहेत.
मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक जण असे असून त्यांनी दोन-तीन लग्न केलेली आहेत. त्यांचे लग्न होऊनही कायमच ते प्रसिद्धी माध्यमांच्या चर्चांमध्ये दिसून येत असतात. सोहेल खान, आमिर खान, हृतिक रोशन, अरबाज खान यांसारख्या अनेक कलाकारांचे घटस्फोट झाले असून त्यापैकी काहींनी दुसरं लग्नसुद्धा केलंय. तर यांच्यापैकी काहीजण रिलेशिनशिपमध्ये असल्याचं दिसून आलं आहे.
असा अभिनेता जो एक्स बायकोलाच करतोय डेट
असा एक बॉलिवूड अभिनेता असून जो त्याच्या एक्स बायकोलाच डेट करत असल्याचं दिसून आलं आहे. त्याचा बायकोसोबत ८ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता आणि ते दोघे आता रिलेशिनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून गुलशन देवैया आहे. गुलशनचं कॅलिराॅय सोबत २०१२ मध्ये लग्न झालेलं. ती एक ग्रीक नागरिक आहे.
लग्नाच्या आठ वर्षानंतर घेतला घटस्फोट
लग्नाच्या आठ वर्षानंतर गुलशनने त्याच्या बायकोसोबत घटस्फोट घेतला होता पण दोघेही चांगले मित्र मैत्रीण होते. त्यांनी त्यांच्या नात्याला दुसरी संधी देण्याचं ठरवलं आणि आता ते दोघे एकत्र आले आहेत. 'ती भारतात फिरायला आली होती. त्यादरम्यान आम्ही भेटलो आणि प्रेमात पडलो. त्यावेळी ती युकेमध्ये राहत होती. ती ग्रीक नागरिक आहे. आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं होतं, त्यामुळे आम्ही लग्न केलं' असं गुलशनने एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
काय म्हणाला गुलशन?
काही काळानंतर आमचं वैवाहिक जीवन कठीण होऊ लागलं. एकमेकांवर प्रेम असणं पुरेसं ठरत नव्हतं. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी बोलणं, चर्चा करणं बंद झालं होतं. मी अशा क्षेत्रात काम करतो जे अनिश्चित आहे आणि नेहमी बदलतं. त्यामुळे कामाच्या अस्थिरतेत मला वैयक्तिक आयुष्यात स्थिरता हवी होती. पण माझं लग्न आणि नातं मला ती स्थिरता देऊ शकत नव्हतं. त्यामुळे मी खूप निराश व्हायचो आणि चिडचिड करायला लागलो, असं गुलशन म्हणाला.
