महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक यात्रेचे महत्त्व अधोरेखित करत, अभिनेते आदेश बांदेकर यांनी रांजणगावजवळ घडलेल्या एका अपघाताचा अनुभव सांगितला आहे. या अनुभवातून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडल्याचे ते सांगतात.

महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीची यात्रा प्रसिद्ध असून या ठिकाणी श्रद्धा आणि भाव ठेवून भाविक जात असतात. मोरगाव येथील मोरेश्वर गणपतीच्या दर्शनापासून या यात्रेला सुरुवात केली जाते. सिद्धटेक, पाली, महड, थेऊर, रांजणगाव, ओझर आणि शेवटी लेण्याद्री या आठ मंदिरांचा प्रवास पूर्ण होतो. प्रत्येक मंदिराची खास अशी रचना असून या ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने जात असतात.

अभिनेते आदेश बांदेकर काय म्हणाले? 

अभिनेते आदेश बांदेकर यांनी यावेळी त्यांच्याबाबतीत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. ते म्हणतात की, अष्टविनायक यात्रा ही फक्त एका दर्शनासाठी नसते. अनेकदा भाविक या ठिकाणावरून जीवन बदलवून टाकणारे अनुभव घ्यायला येतात. नगर पुणे रस्त्यावर रांजणगाव परिसरात त्यांच्या बाबत घडलेला एक अनुभव त्यांनी शेअर केला आहे.

या ठिकाणी माझ्याबाबत जीवन बदलवून टाकणारा अनुभव आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात की, एकदा माझ्या वाहनाचा अपघात झाला, त्यात एक लहान बाळ होतं. ते बाळ जखमी झालं पण तरीही ते सुरक्षित होतं. गणरायाच्या कृपेने त्याला काहीही झालं नाही. अशा अनेक गोष्टी आपण देवावर श्रद्धा ठेवल्यावर घडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अष्टविनायक यात्रा करा पूर्ण 

अनेक भाविक या अष्टविनायक यात्रेचा आनंद साजरा करत असतात. ते या यात्रेमध्ये आपली श्रद्धा देवाच्या चरणी ठेवून प्रार्थना करत असतात. आपल्या चेहेऱ्यावर हसू ठेवून देवाला नमस्कार करून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष सुरु असतो. अष्टविनायक यात्रा पूर्ण व्हायला एक निमित्त लागत असते, आपणही या यात्रेला सुरुवात करून देवाच्या दर्शनाचा आनंद घेऊ शकता.