सौदी अरेबियात अनैतिक कृत्यांमध्ये गुंतलेल्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 'असीर रिजन पोलीस' आणि 'जनरल डायरेक्टरेट ऑफ कम्युनिटी सिक्युरिटी अँड अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग' यांनी संयुक्त कारवाई करत या दोघींना रंगेहाथ पकडलं.
रियाध: दक्षिण सौदी अरेबियातील असीर भागात अनैतिक कृत्यांमध्ये गुंतलेल्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
'असीर रिजन पोलीस' आणि 'जनरल डायरेक्टरेट ऑफ कम्युनिटी सिक्युरिटी अँड अँटी-ह्युमन ट्रॅफिकिंग' या विभागांनी मिळून एक विशेष मोहीम राबवली. याच कारवाईदरम्यान या दोघी पोलिसांच्या जाळ्यात अडकल्या.
पब्लिक सिक्युरिटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्यावर प्राथमिक कायदेशीर कारवाई पूर्ण झाली आहे. आता पुढील तपास आणि कारवाईसाठी हे प्रकरण 'पब्लिक प्रॉसिक्युशन'कडे सोपवण्यात आलं आहे.
