Pune : पुण्यात महिलेला भररस्त्यात उचलून नेण्याचा प्रयत्न, आरोपी अटकेत

Share this Video

पुण्यातील कात्रज परिसरात २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी एका महिलेचा विनयभंग करून तिला जबरदस्तीने उचलण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली. झटापटीत महिला खाली पडल्याने तिच्या हाताला दुखापत झाली. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जीतू किशोरीलाल सरोज याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगडचा असून पुण्यात मजुरी करतो. आरोपी आणि पीडित महिलेची पूर्वीची ओळख नसल्याचे तपासात समोर आले.

Related Video