Crime : ठाण्यातील नागरिकावर चीनमध्ये हल्ला, बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास दिला होता नकार

| Published : Mar 26 2024, 12:26 PM IST / Updated: Mar 26 2024, 12:28 PM IST

Fake Call Centre, Delhi Police, Fake Call Center in Delhi, Call Center in Delhi, Delhi News, Delhi Police Action

सार

ठाण्यातील नागरिकावर चीनमध्ये हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यासाठी व्यक्तीने नकार दिल्याने त्याच्यावर हल्ला केला गेला.

Crime News : ठाणे (Thane) येथे राहणाऱ्या एका 23 वर्षीय व्यक्तीवर चीनमध्ये हल्ला करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. खरंतर, चीनमध्ये (China) काम करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने पोलिसात धाव घेत दोषींना अटक करावी अशी मागणी केली आहे. याशिवाय नोकरीच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना फसवणूक करण्याच्या कामाला नकार दिल्याने चीनमध्ये हल्ला केल्याचे व्यक्तीने पोलिसांना तक्रारीत सांगितले आहे.

एस. सी. यादव असे व्यक्तीचे नाव असून त्याने हॉटेल मॅनेजमध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. नातेवाईकांच्या सहकाऱ्याने परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करून दिल्याचे यादव याने म्हटले. याशिवाय परदेशात काम केल्यानंतर प्रति महिन्याला 65 हजार रुपये मिळतील म्हणून यादवने नोकरीही स्विकारली. नोकरीच्या ठिकाणी आणखी 30 भारतीयही काम करत असल्याचे यादव याने म्हटले.

व्यक्तीने पोलिसात केली तक्रार
यादव याने पुढे म्हटले की, परदेशात नोकरी करण्यासाठी सर्व कायदेशीर काम केले. पण नंतर युके, युएस आणि युरोपातील अन्य नागरिकांकडून आपली फसवणूक झाल्याचे कळले. हे नागरिक व्यक्तींना क्रिप्टोकरेंसीमध्ये गुंतवणूक केल्यास उत्तम नफा मिळण्याचे आमीष दाखवतात.

ज्या परदेशातील नागरिकांसोबत यादवचा संपर्क होत होता त्यांचे क्रिप्टोकरेंसीमध्ये गुंतवलेले आणि नफा झालेले पैसे दिसत होते. पण ते काढू शकत नाव्हते. याशिवाय नोकरीवरील वेतनच दिले गेल्याचे यादवने पोलिसांना सांगितले. भारतात परत येण्यासाठी यादवने भारतीय दूतवासाची मदतही घेतली.

कॉल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी केला हल्ला
यादवने म्हटले की, कॉल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी मला पकडले आणि एका खुर्चीला बांधून ठेवत मारहाण केली. माझा पासपोर्टही जप्त केला. हा सर्व प्रकार डिसेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दाखल फौजदारी गुन्हा
यादवने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय बनावट कॉल सेंटर आणि नोकरीचे आमिष दाखवणारी प्रकरणे उघडकीस आणली पाहिजेत असेही पोलिसांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Moscow Firing : मॉस्को येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या गोळीबारात 60 जणांचा मृत्यू, दहशतवादी संघटना Islamic State ने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Crime : बत्ती गुल होण्याच्या भीतीपोटी मुंबईतील नागरिकाने गमावले तीन लाख रुपये, वाचा संपूर्ण प्रकरण सविस्तर…