हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी केली महिलेची हत्या...

| Published : Apr 02 2024, 04:21 PM IST

Crime

सार

कायद्याने हुंडा बंदी जरी असली तरी आजही हुंडा मागितला जात आहे मग तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष यातूनच नोएडा मधील एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. सासरच्या लोकांनी केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय.

दिल्ली : ग्रेटर नोएडा येथील एका कुटुंबाने आपल्याच सुनेची हत्या केली आहे. हत्या करण्यामागचे कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. लग्न ठरवताना मुलाकडच्यांनी नावरीकडे 21 लाख रुपये आणि टोयोटा फॉर्च्युनर गाडी असा हुंडा मागितला होता. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे महिलेला सासरच्या लोकांनी छळले आणि मारहाणही केली असा आरोप मृत्यू झालेल्या महिलेच्या भावाचा आहे. मृत्यू झालेल्या महिलेचे नाव करिश्मा आहे.

करिश्माचा भाऊ दीपक याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आरोप केला आहे की, तिने शुक्रवारी तिच्या कुटुंबीयांना फोन केला आणि पती विकास आणि आई-वडील आणि भावंडांनी तिला मारहाण केल्याची माहिती दिली होती. तिचा विचारपूस केली गेली आणि तातडीने सगळे तिचा सासरी पोहोचलो समजले कि तीचा मृत्यू झाला आहे. दिपकने पोलीस स्टेशन गाठले आणि भाटी कुटुंब विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विकास, त्याचे वडील सोमपाल भाटी, आई राकेश, बहीण रिंकी आणि भाऊ सुनील आणि अनिल यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.

करिष्माचे 2022 सालीचा झाले होते लग्न :

करिश्माने डिसेंबर 2022 मध्ये विकाससोबत लग्न केले आणि हे जोडपे ग्रेटर नोएडाच्या इकोटेक-3 मधील खेडा चौगनपूर गावात विकासच्या कुटुंबासोबत राहत होते. दीपकच्या म्हणण्यानुसार, तिच्या कुटुंबाने लग्नाच्या वेळी वराच्या कुटुंबाला 11 लाख रुपयांचे सोने तसेच एक एसयूव्ही दिली होती. मात्र, विकासच्या कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे हुंड्याची मागणी करत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला, असा आरोप त्यांनी केला.

हुंडा देऊनही बहिणीची हत्या :

दिपकने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिने मुलाला जन्म दिला त्या नंतर आम्हाला वाटले की आता सगळे ठीक होईल मात्र, सासरच्या मंडळींनी त्रास देणे आणखीनच वाढवले. दोन कुटुंबांनी विकासच्या गावात अनेक पंचायत बैठकीद्वारे मतभेद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर करिश्माच्या कुटुंबीयांनी त्याच्या कुटुंबाला आणखी 10 लाख दिले पण अत्याचार थांबला नाही. एवढे पैसे देऊनही माझी बहीण वाचू शकली नाही याहून अधिक दुःख काय असेल.

आणखी वाचा :

पतंजलीला जाहिरातीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिली चेतावणी, बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण होते हजर

मध्य प्रदेशातील विद्यार्थ्याला इन्कम टॅक्स विभागाने धाडली तब्बल 46 कोटी रुपयांची नोटीस, नक्की काय आहे प्रकरण वाचा

Crime News : मित्रचं झाला वैरी ; ब्लो ड्रायरचे नोझल गुदाशयात टाकल्याने तरुणाचा मृत्यू