सार

Worli Heat And Run Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. अपघातावेळी मुलगा आणि चालक गाडीत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Worli Heat And Run Accident : वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राजेश शहा हे पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. अपघात झाला त्यावेळी राजेश शहा गाडीत नव्हते. मात्र, वरळीतील हिट अँड रन प्रकरण घडलं त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू गाडीत शिंदे गटातील उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता. आरोपी मुलगा अद्याप फरार आहे. पोलिसांकडून आरोपी मुलगा आणि ड्रायव्हर दोघांचाही कसून शोध घेत आहेत. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली होती. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडलीय. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केलंय.

आणखी वाचा :

Worli Heat And Run Accident : वरळीत चारचाकी गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू, चालक फरार

Nashik Car Accident : नाशिकच्या गंगापूर रोडवर पुलाचा कठडा तोडून भरधाव कार गोदावरी नदीत कोसळली, 1 जण ठार तर 2 गंभीर जखमी