Nashik Car Accident : नाशिकच्या गंगापूर रोडवर पुलाचा कठडा तोडून भरधाव कार गोदावरी नदीत कोसळली, 1 जण ठार तर 2 गंभीर जखमी

| Published : Jul 06 2024, 05:10 PM IST

Nashik Car Accident

सार

Nashik Car Accident : गोदावरी नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव कार नदीपात्रात कोसळली. या अपघातात एक जण ठार झाला आहे, तर दोन तरुण जखमी झाले आहेत. गंगापूर धरण परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.

 

Nashik Car Accident : नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुलावर एक भीषण अपघात झाला असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोदावरी नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव कार नदीपात्रात कोसळली. गंगापूर धरण परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. कारमधून तीन जण प्रवास करत होते, त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातात नितीन कापडणीस या तरुणाचा मृत्यू झाला आहे. किरण कदम व योगेश पानसरे अशी गंभीर जखमी असलेल्या तरुणांची नावे आहेत. नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात असलेल्या गंमत जंमत हॉटेलजवळ रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला. भरधाव कार थेट नदीवरील पुलाचा लोखंडी कठडा तोडून थेड नदीपात्रात कोसळली.

भीषण अपघातात कारचा झाला चक्काचूर

हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला असून दरवाजे तुटून बाजुला पडले आहेत. या अपघातात एकाला जीव गमवावा लागला आहे. जखमींना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

आणखी वाचा :

धक्कादायक बातमी, कळवा रुग्णालयात 30 दिवसांत 21 नवजात बालकांचा मृत्यू