सार

Worli Heat And Run Accident : मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे.

Worli Heat And Run Accident : वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. मासळी बाजारातून मासे आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केल्याची माहिती मिळत आहे. फरार चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

नेमकं असा झाला अपघात

मुंबईतील वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारं नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी मासांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने धडक दिली. दाम्पत्याकडे खूप सामान आणि मासे होते. त्यामुळे नवऱ्याचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकी गाडीच्या बोनेटवर पडले. नवऱ्याने प्रसंगावधान राखत बोनेटवरुन बाजूला उडी टाकली. मात्र, महिलेला स्वतःला बाजूला होता आले नाही.

अपघातानंतर गाडीसह चालक फरार

अचानक झालेल्या सर्व प्रकारामुळे चारचाकी गाडीचा चालक घाबरला होता. चालकाने गाडी पळवली. त्यात त्याने बोलेटवर पडलेल्या कोळी महिलेला फरफटत नेले. या अपघातात नवरा थोडक्यात बचावला. मात्र, महिला गंभीर जखमी झाली होती. महिलेला तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी महिलेला मृत घोषिक केले. अपघातात दुचाकी चालवणारा नवरा थोडक्यात बचावला असून महिलेचा मात्र गाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर गाडीसह चालक पळून गेला आहे. पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.

आणखी वाचा :

Nashik Car Accident : नाशिकच्या गंगापूर रोडवर पुलाचा कठडा तोडून भरधाव कार गोदावरी नदीत कोसळली, 1 जण ठार तर 2 गंभीर जखमी