सार

Maharashtra Hit and Run Case:  ठाणे येथील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (SIT) रविवारी रात्री (17 डिसेंबर, 2023) अश्वजीत याच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Maharashtra Hit and Run Case : ठाणे येथील हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी अश्वजीत गायकवाडसह तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त अमर सिंग जाधव यांच्या नेतृत्वाखील पोलिसांच्या विशेष पथकाने (SIT) सर्व आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यात आली आहे. अश्वजीत गायकवाड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (Maharashtra State Road Development Corporation managing director) अनिल गायकवाड यांचा मुलगा आहे. 

अश्वजीत गायकवाड याने प्रेयसी, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हिला कारने उडवण्याच्या प्रयत्न केल्याचे पोलिसांनी रविवारी (17 डिसेंबर, 2023) म्हटले. अश्वजीत गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेळके अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती देत म्हटले की, या घटनेतील पीडित तरुणी जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी घटनेबद्दल अधिक माहिती देत सांगितले की, आरोपी अश्वजीत गायकवाडसह अन्य दोन आरोपींच्या विरोधात कलम 323, 279 सह वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआयटी करणार तपास
या प्रकरणी अधिक तपासासाठी पोलीस उपायुक्त झोन पाच अमर सिंग जाधव यांच्या अंतर्गत एसआयटी स्थापन करण्यात आली. ठाणे पोलीस आयुक्त जय जीत सिंग यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी सर्व दृष्टीकोनातून विचार केला जाईल. साक्षीदारांचा जबाब घेतला जात असून पुरावेही जमा केले जात आहेत.अश्वजीत याने पीडित तरुणीला गाडीने उडवल्याने ती जखमी झाली असून तिला रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त यांनी शनिवारी (16 जानेवारी, 2023) म्हटले की, "घोडबंदर रोड येथील हॉटेलजवळ पीडित तरुणी अश्वजीतला भेटण्यासाठी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. पहाटे चार वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले."

नक्की काय आहे प्रकरण
पीडित तरुणी आणि अश्वजीतसोबत असलेल्या रोमिल पाटील, सागर यांच्यामध्ये वाद झाला. याच दरम्यान, आरोपीने पीडित तरुणीला त्याच्या कारने उडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित तरुणी जखमी झाल्याने तिला रुग्णालात दाखल करण्यात आले. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवला आहे. 

पीडित तरुणीने असे म्हटले की, ती अश्वजीत याच्यासोबत साडे चार वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. अश्वजीत याचे लग्न झाले आहे हे माहिती सुद्धा नव्हते. नंतर अश्वजीत याच्या लग्नाबद्दल कळल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. अश्वजीतने तो आणि बायको एकत्रित राहात नसल्याचेही त्याने पीडित तरुणीला सांगितले होते. 

अश्वजीतने पीडित तरुणीला आपण लग्न करूयात हे देखील म्हटले होते. पण ज्यावेळी ती अश्वजीतला रात्री भेटण्यासाठी गेली असता, त्यावेळी तो बायकोसोबत होता. अश्वजीतशी बोलण्यासाठी गेली असता तो संतप्त झाला आणि तेथेच त्याने वाद घालण्यास सुरूवात केल्याचे पीडित तरुणीने म्हटले.

याप्रकरणी पीडित तरुणीला गंभीर दुखापत झाली आहे. आरोपींच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय पीडित तरुणीने सोशल मीडियात देखील तिच्यासोबत काय घडले याची पोस्टही शेअर केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा: 

एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आईची मागणी

Mumbai Crime : कुरिअर कंपनीत 4 कोटी रूपयांची चोरी, पोलिसांनी 30 तासात चोरट्यांना ठोकल्या बेड्या

मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचत वडिलांकडून उकळले पैसे, तपासात धक्कादायक कारण समोर