धक्कादायक! वडील आणि भावाची हत्या करत मृतदेहाचे केले तुकडे, दोन महिन्यांपासून फरार झालेल्या अल्पवयीन आरोपी मुलीचा पोलिसांनी असा लावला छडा

| Published : May 30 2024, 11:48 AM IST / Updated: May 30 2024, 11:50 AM IST

bjp arrest
धक्कादायक! वडील आणि भावाची हत्या करत मृतदेहाचे केले तुकडे, दोन महिन्यांपासून फरार झालेल्या अल्पवयीन आरोपी मुलीचा पोलिसांनी असा लावला छडा
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Crime : मध्य प्रदेशातील जबलपुर येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलीने स्वत:च्या वडिलांसह भावाची हत्या केल्यानंतर पळ काढला होता. यामागील कारण काय आणि नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर....

Jabalpur Double Murder Case : मध्य प्रदेशातील जबलपुर येथे वडील आणि भावाची हत्या करणाऱ्या अल्पवयीन आरोपी मुलीला हरिद्वार येथून अटक करण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांनी बुधवारी (29 मे) जिल्हा रुग्णालयाजवळून ताब्यात घेतले आहे. मार्च महिन्यात 14 ते 15 तारखेदरम्यान जबलपुरमधील मिलेनियम कॉलनीत एका वडील-मुलाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अल्पवयीन मुलीसह मुकुल कुमार सिंह नावाच्या आरोपीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. अल्पवयीन आरोपी मुलीला हरिद्वार येथून अटक केली असून तरुणाने पळ काढला आहे.

नक्की काय आहे प्रकरण
अल्पवयीन आरोपी मुलीने आपल्या प्रियकरासोबत मिळून भाऊ आणि वडिलांची हत्या केली होती. हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवून घटनास्थळावरुन पळ काढला होता. संपूर्ण प्रकरण हैराण करणारे आहे. या घटनेत प्रियकर मुकुल याने कुऱ्हाडीने दोघांची हत्या केली होती.

दोन वर्षांपूर्वी पॉक्सो कायद्याअंतर्गत तुरुंगात पाठवल्याचा बदला घेण्यासाठी आरोपीने हत्या केली. एसएसपी प्रमेन्द्र डोबाल यांनी म्हटले की, 14-15 मार्चच्या रात्री मध्य प्रदेशातील जबलपुरच्या सिव्हिल लाइन्सच्या रेल्वेच्या मिलेनियम कॉलनीत हत्याकांड झाला होता. कॉलनीतील 363-3 ब्लॉकमध्ये जबलपुरच्या रेल्वे मंडळात हेड क्लर्क पदी असणाऱ्या 52 वर्षीय राजकुमार विश्वकर्मा आणि त्यांचा नऊ वर्षाचा मुलगा याची हत्या करण्यात आली होती.

वडील आणि मुलाच्या हत्येचा आरोप मुलीसह तिचा प्रियकर मुकुलवर लावण्यात आला होता. आरोपीला मुकुलला दोन वर्षांआधी रेल्वे कर्मचारी राजकुमारने पॉक्सो कायद्याअंतर्गत तुरुंगात पाठवले होते. यानंतर त्याने आपली विधाने बदलली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मुकुलने अल्पवयीन आरोपी मुलीसह लग्न करण्याचा विचार केला असता वडिलांनी त्यासाठी नकार दिला.

अशातच आरोपी मुकुलने वडिलांच्या हत्येचा कट रचला. आरोपीच्या मनात आपल्याला तुरुंगात पाठवलेय याचा राग होता आणि याचाच बदला त्याला घ्यायचा होता. अशातच हत्येनंतर पोलिसांकडून अल्पवयीन आरोपी आणि मुकुल याचा शोध घेण्यासाठी सातत्याने ठिकठिकाणी छापेमारी करत होती. अशातच मंगळवारी रात्री महिला जिल्हा रुग्णालयाजवळ आरोपी मुलगी फिरताना दिसली.

अल्पवयीन आरोपी मुलीला अटक
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुकुल कुमार सिंह डबल मर्डरमधील मुख्य आरोपी आहे. मुकुलने हरिद्वार येथून पळ काढला आहे. पण अल्पवयीन आरोपी मुलीला अटक केली आहे. हे दोघेजण एकत्रित आहे. अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता आपणच हत्या केल्याचे मान्य केले आहे. खरंतर वडील आणि भावाची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला होता. मार्च महिन्यानंतर अल्पवयीन मुलगी फरार होती. अशातच आता पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलीला अटक केली आहे.

ऑनलाइन पद्धतीने मागवली होती हत्यारे
अल्पवयीन आरोपी मुलीने पोलिसांना सांगितले की, हत्या करण्यासाठी आरोपी मुकुलने ऑनलाइन पद्धतीने कुऱ्हाड आणि अन्य हत्यारे मागवली होती. हत्येनंतर हत्यारे मोतीचूरच्या जंगलात फेकून देण्यात आली.

काही शहरांमध्ये दहा हजार पोस्टर्स लावले
जबलपुर पोलिसांनी मुकुल सिंहला फरार ठरवत 10 हजार पोस्टर्स काही शहरांमध्ये लावले. पश्चिम बंगाल, नेपाळच्या बॉर्डरवर देखील पोस्टर्स लावले जेणेकरुन आरोपीला अटक करता येईल.

आणखी वाचा : 

दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी, सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर पळवला

कर्नाटकातील उडपीमध्ये दोन गटांत झाला राडा, एका व्यक्तीला स्विफ्टने उडवल्यामुळे त्याचा जागीच झाला मृत्यू?