दुकानाचे शटर उचकटून २९ लाखांच्या दागिन्यांची चोरी, सीसीटीव्ही कॅमेरे तोडून डीव्हीआर पळवला

| Published : May 26 2024, 04:17 PM IST / Updated: May 26 2024, 04:22 PM IST

Mysuru Dr Balaji Home theft

सार

शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून २९ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करून डीव्हीआर देखील लंपास केला.

 

पिंपरी: प्राधिकरण निगडी येथील पेठ क्रमांक २५ मधील श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाच्या दुकानामध्ये शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान चोरीची घटना घडली आहे. शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातून २९ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान करून डीव्हीआर देखील लंपास केला. संदीप छगनराव बुहाडे (५०, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप बुहाडे यांचे प्राधिकर निगडीमध्ये श्रीलक्ष्मी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानाचे शटर अर्धवट वाकवून अर्धवट उघडे करून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील तिजोरी तोडून २० लाख रुपये किमतीचे ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच नऊ लाख रुपये किमतीचे १० किलो चांदीचे दागिने, १८ हजारांची रोकड तसेच दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एक हजार रुपये किमतीचा डीव्हीआर चोरून नेला. चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कट करून नुकसान केले. तसेच फिर्यादी संदीप यांच्या दुकानाशेजारील इतर दुकानांचे सीसीटीव्ही देखील तोडून नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख पुढील तपास करीत आहेत.

आणखी वाचा:

Pune Porsched Accident : मुलाला सहीसलामत सोडण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या आईने चालकाकडे केली होती विनंती