सार
पंजाबमध्ये हा भयंकर प्रकार घडला आला आहे. एका माणसाने संतापाच्या भरात आपल्या गरोदर पत्नीला जाळून मारलं. तिच्या पोटात जुळी बाळं होती. याचा थोडाफार पण विचार केला नाही. क्रूरतेचा विकोपाने जगात येण्याआधीच त्या जुळ्यांचा अंत झाला. वाचा काय नेमकं घडलं ?
मुलं जन्माला येणार म्हणून अनेक पालक आनंदी असतात. त्यांचे जग संपूर्ण स्वप्नांनी भरलेले असते. मग ते मुलं जन्माला येण्याआधीच त्याचा सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते यात शिक्षणापासून ते त्याचा दररोजच्या गरजांपर्यंत सगळ आधीच तयार असत. पण सगळ्यांच्याच बाबतीत असे होईलच यात काही शंका नाही. काही लोक याला अपवाद असतात असं दाखवणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.पंजाबमधील एका माणसाने संतापाच्या भरात आपल्या गरोदर पत्नीला जाळून मारलं. तिच्या पोटात जुळी बाळं वाढत होती, मात्र हे कृत्य करताना त्या कोवळ्या जीवांचा विचार या माणसाने केला नसावा का असा प्रश्न निर्माण होत आहे.
पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यातील रईया भागात बुलेड नंगल गावात ही घटना घडली आहे. सुखदेव असं या आरोपीचं नाव आहे. त्याच्या पत्नीचं नाव पिंकी होतं. त्या दोघांची सतत भांडणं होत असत. पिंकी सहा महिन्यांची गर्भवती होती आणि तिच्या पोटात जुळी बाळं वाढत होती. मात्र, सुखदेवने केलेल्या कृत्यामुळे या जगात येण्याआधीच आईसह त्या बाळांचा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घडलं असं की , सुखदेव आणि पिंकी यांचं शुक्रवारी जोरदार भांडण झालं. हे भांडण एवढं विकोपाला गेलं की त्याच रूपांतर हिंसेत झालं . सुखदेव याने पिंकीला बेडला बांधलं आणि बेडसह तिला जाळून टाकलं. ती वाचवा वाचावा म्हणून किंचाळत होती मात्र आग भयानक असल्याने तिला वाचवण्याचा प्रयत्न कोणीही करू शकाल नाही. या सगळ्यात मात्र सुखदेवच्या मनाला थोडासा सुद्धा पाझर फुटला नाही. दुर्दैवाने पिंकीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी ६ महिन्यांची गरोदर होती. तिच्या पोटात जुळी बाळं होती. या जगात येण्यापूर्वीच आपल्या आईबरोबर त्यांनी प्राण सोडले. हे कृत्य केल्यानंतर सुखदेव फरार झाला आहे. त्याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही, मात्र पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाकडून दाखल :
राष्ट्रीय महिला आयोगाने पंजाब पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. X पोस्टमध्ये, NCW ने म्हटले आहे की, "अमृतसरमधील भयावह घटनेमुळे एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीला जिवंत जाळले आहे. या कृत्याची क्रूरता अकल्पनीय आहे.राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा यांनी DGP पंजाबला गुन्हेगाराला अटक करण्यासाठी आणि तीन दिवसांत कारवाईचा अहवाल सादर करण्यासाठीचे पत्र लिहिले आहे.