ITR फाईल करण्यासाठी आता फक्त मोजके दिवस उरले आहेत. अनेकांनी अजूनही आयटीआर भरलेला नाही. त्यामुळे तुम्ही देखील शेवटच्या क्षणाची वाट पाहात असाल तर असं करणं तुमच्यासाठी अडचणीचं ठरु शकतं. आयटीआर भरताना काय काळजी घ्यावी आणि कसा दाखल करावा जाणून घेऊयात.
ITR Deadline : तुम्ही नोकरी करत आहात आणि जर तुम्ही अजून तुमच्या इनकम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर तुम्ही अलर्ट व्हा. कारण आर्थिक वर्ष 2026-27 साठी आयकर विभागाकडून आयटीआर भरण्यासाठी 31 जुलै 2026 शेवटची तारीख असणार आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) माहिती दिली की, आतापर्यंत 4 कोटी लोकांनी आपला ITR (फॉर्म 1 आणि 2) भरला आहे. जशी जशी शेवटची तारीख जवळ येत आहे इनकम टॅक्स भरण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. आयकर विभागाने म्हटले की, 31 जुलैची वाट पाहू नका, कारण छोटी चूक पण अडचणीत आणू शकते.
4 कोटी लोकांनी भरला आयटीआर
आयकर विभागाने म्हटले की, AY 2026-27 साठी 4 कोटी लोकांनी ITR भरला आहे. शेवटच्या वेळी ITR-1 आणि ITR-2 भरण्यासाठी गर्दी होऊ नये आणि साईटवर जास्त ट्राफिक येऊन साईटवर तांत्रिक त्रुटी येऊ नयेत म्हणून डेडलाईनची वाट न पाहता लगेच आयटीआर भरण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
31 जुलैची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ITR भरण्यासाठी कोणतीही चूक होऊ नये म्हणून वेळेत तो भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेवटच्या क्षणी चुका होतात. त्यामुळे चुकीचा आयटीआर भरला जातो. तसे होऊ नये म्हणून आतापासूनच आवाहन केले जात आहे.
ITR भरतान कोणते कागदपत्र पडताळावे
AIS (Annual Information Statement)
TIS (Taxpayer Information Summary)
Form 26AS
Form 16
बँक स्टेटमेंट
गुंतवणूकशी संबंधित कागदपत्र
ITR भरताना कोणती काळजी घ्यावी.
योग्य ITR फॉर् निवडा
आयकर स्रोत दाखवा
कॅपिटल गेन झाला असेल तर योग्य माहिती द्या.
बँक अकाउंटचे तपशील तपासून घ्या.
डिडक्शनचा योग्य दावा करा.
ITR भरताना काय चुका होतात?
अनेक लोकं ITR दाखल करताना अनेक चुका करतात. सबमिट केल्यानंतर अनेक जण तो ई व्हेरिफाय करण्याचे विसरुन जातात. जर तुम्ही तसे केले नाही तर तुमच्या आयटीआर दाखलच होत नाही. तो इनवॅलिड ठरवला जातो.
31 जुलैच्या आधी ITR भरण्याचे फायदे
शेवटच्या क्षण येणाऱ्या समस्या टाळता येतात
चुका झाल्या असतील तर सुधारता येतात
पोर्टलवरील तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत नाही
योग्य रिटर्न भरता येतो

