हरियाणात भाजप सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. नायब सिंग सैनी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. त्यांनी सीएए कायद्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सीएएच्या कायद्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहचले आहे. इंडियन युनियन मुस्लिम लीग आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने या कायद्याला विरोध केला असून अंमलबजावणीवर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी कामांच्या पायाभरणीचा धडाका लावला आहे. बंगालमध्येही सरकारकडून काम केले जात असल्याचं दिसून आलं.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
CAA कायदयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून वेबसाइटवरून नागरिक भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देणार आहे.
महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनच्या वापरास मान्यता दिली आहे. अशा प्रकारे मान्यता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संध्याकाळी घोषणा केली आहे. यावेळी डीआरडीओचे मिशन दिव्यास्त्र यशस्वी झाल्याचे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुग्राममध्ये द्वारका एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. त्यांनी इतरही अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आहे.