Winter Skin Care : कोरड्या त्वचेच्या समस्येतून हवीय सुटका? हिवाळ्यात असे फॉलो करा रुटीन

थंडीचे दिवस सुरू झाल्याने त्वचेची काळजी घेणे अत्यावश्यक असते. त्यामुळे डेली रूटीनमध्ये तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करू शकता हे पाहुया.

Chanda Mandavkar | Published : Nov 24, 2023 6:42 AM IST / Updated: Nov 24 2023, 02:37 PM IST
17
हिवाळ्यातील स्किन केअर रुटीन

Winter Skin Care Tips : थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. तसे केले नाही तर थंड वातावरणामुळे त्वचा ड्राय होण्याची शक्यता असते. त्यामुळे थंडीत आपल्या डेली रुटीनमध्ये काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

खरंतर काही टिप्स फॉलो करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये बहुतांश असे प्रोडक्ट्स मिळतील, ज्यांचा वापर करून आपण आपल्या त्वचेची व्यवस्थित काळजी घेऊ शकता. त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी नियमित काही निवडक प्रोडक्ट वापरणं गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये कशा प्रकारे स्किन केअर रुटीन फॉलो करावं, जाणून घेऊया सविस्तर माहिती…

27
मॉइश्चराइझर

थंडीत तुमची स्किन ड्राय होऊ (Dry Tvachesathi Upay) नये म्हणून काळजी घ्यावी. जर त्वचा वारंवार कोरडी होत असेल तर सुरकुत्यांची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे थंडीत त्वचेमध्ये ओलावा टिकून राहावा, म्हणून मॉइश्चराइझरचा वापर करणे गरजेचं आहे. 

37
सनस्क्रिन लोशन

जेव्हा आपली त्वचा उन्हाच्या संपर्कात येते, त्यावेळेस सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही जण थंडीमध्ये सनस्क्रिन लोशन लावणे टाळतात. पण आपण मोठी चूक करताय, हे लक्षात घ्या. घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रिन लोशन लावणं अत्यंत गरजेचे आहे. 

47
शरीर हाइड्रेट ठेवा

कडाक्याच्या थंडीत काही जण खूप कमी प्रमाणात पाणी पितात. पण यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ज्याचा परिणाम त्वचेवर होऊ लागतो. परिणामी त्वचा कोरडी होऊ लागते. थंडीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास संपूर्ण शरीर हायड्रेट राहते. यामुळे त्वचेवरही नैसर्गिक तेज येते.  

57
गरम पाण्याने आंघोळ करणे टाळा

बहुतांश जण हिवाळ्यामध्ये अति जास्त प्रमाणात गरम पाण्याने आंघोळ करतात. पण याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करावी. यामुळे त्वचेतून स्त्राव होणाऱ्या नैसर्गिक तैल ग्रंथींवर परिणाम होणार नाही. तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे तूप किंवा तेलही मिक्स करू शकता. यामुळे त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळेल. 

67
लिप बाम

थंडीमध्ये ओठांची त्वचा फाटण्याची समस्या सामान्य आहे. पण तरीही या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. थंडीत लिप बाम न वापरल्यास ओठांच्या त्वचेवरही मृत पेशी जमा होऊ लागतात. यामुळे ओठ काळे पडण्याचीही समस्या उद्भवते. शक्य असल्यास आपण घरच्या घरी नैसर्गिक सामग्रींपासून लिप बाम तसेच स्क्रब देखील तयार करू शकता.

आणखी वाचा:

White Hair Solution : पांढऱ्या केसांपासून हवीय मुक्तता? मग करा हे आयुर्वेदिक उपाय

Hair Growth Tips : केसगळतीपासून ते कोंड्यापर्यंत सर्व समस्या होतील दूर, केसांसाठी वापरा ही हिरवीगार पाने

चेहऱ्यावर हवाय ब्युटी पार्लर ट्रीटमेंटसारखा ग्लो? मग फॉलो करा या टिप्स

77
Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Share this Photo Gallery