जगातील अशी काही मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दलच्या काही अनोख्या कथा आहेत. अशातच जापानमध्येही एक मंदिर आहे, ज्याला घटस्फोटाचे मंदिर म्हणून संबोधले जाते. जाणून घेऊया याच मंदिराबद्दलची खासियत आणि इतिहास सविस्तर...
Divorce Temple in Japan : जगाभरातील हजारो मंदिरांचा स्वत:चा एक इतिहास किंवा कथा आहे. काही मंदिरे आपल्या वास्तूकलेसाठी तर काही आपल्या धार्मिक मान्यतेसाठी ओखळली जातात. भारतामध्ये देवी-देवतांची अनेत मंदिरे आहेत. पण तुम्हाला माहितेय का, जापानमध्ये एक मंदिर आहे ज्याला ‘घटस्फोटाचे मंदिर’ म्हणून ओखळले जाते.
घटस्फोटाचे मंदिर अशा महिलांसाठी आश्रम स्थळ आहे ज्यांच्यावर घरगुती हिंसा किंवा अत्याचार झाला आहे. असे म्हटले जाते की, काही वर्षांपूर्वी ज्यावेळी जापानमधील महिलांना अधिकार फार कमी होते तेव्हा या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या मंदिरात येऊन महिला शारिरीक आणि मानसिक रुपात ठिक होण्यासह त्यांना सामाजिक पाठिंबाही मिळत होता. आजही हे मंदिर महिला सशक्तीकरणाचे प्रतीक असल्याचे दिसून येते.
हिंसाचार झालेल्या महिलांसाठी आश्रम स्थळ
महिलांवर झालेल्या घरगुती हिंसाचार किंवा अत्याचार झालेल्या महिला या मंदिरात यायच्या. मंदिराचे दरवाजे नेहमीच अशा महिलांसाठी खुले असायचे ज्या आपल्या पतीच्या विकृत वागण्यामुळे पळून आल्या होत्य. या मंदिरात आल्यानंतर शारिरीक सुरक्षिततेसह आध्यात्मिक शांतीही त्यांना दिली जाते. हे मंदिर आजही अशा सर्व महिलांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे ज्या एखाद्या अत्याचाराचा सामना करत आहेत.
700 वर्ष जुना मंदिराचा इतिहास
जापानमधील कामाकुरा शहरात हे अनोखे मंदिर आहे. याचा इतिहास जवळजवळ 700 वर्ष जुना आहे. या मंदिराचा 'घटस्फोटाचे मंदिर' अशा नावाने ओखळले जाते. या मंदिराची स्थापना बुद्धांच्या अनुयायी काकुसन यांनी पती होजो टोकीमून यांच्यासोबत मिळून केली होता. त्यावेळी महिलांना फार कमी मुलभूत अधिकार होते. याशिवाय महिलांना पतीपासून घटस्फोट घेण्याचा देखील अधिकार नव्हता. काकुसन स्वत: ही अशा एका दुख:द विवाहबंधनात अडकल्या होत्या. यामुळे काकुसन यांनी या मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
मंदिराची खासियत
या मंदिरात महिलेने पतीला घटस्फोट दिल्यानंतर तीन वर्षांपर्यंत राहू शकते. यानंतर मंदिरात राहण्याचा कालावधी कमी करत दोन वर्षे केला जातो. येथे राहिल्यानंतर महिलेला मानसिक आणि शारिरीक रुपात हेल्दी होण्यासह आत्मनिर्भर होण्यास मदत होते. काही वर्षांपर्यंत मंदिरात केवळ महिलांनाच प्रवेश होता. पण वर्ष 1902 मध्ये एंगाकु जी यांनी मंदिरावर ताबा मिळवला तेव्हापासून येथे पुरुष मठाधीशाची नियुक्ती करण्यात आली. यामुळे पुरुषांनाही प्रवेश मिळू लागला.
आणखी वाचा :
Chankya Niti: कोणत्या 4 गोष्टी नेहमी एकट्याने कराव्यात?, जाणून घ्या