धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका वाढतो, युकेमध्ये पुढील पाच वर्षांत ३ लाख कर्करोगाच्या रुग्णांची शक्यता आहे. धूम्रपानामुळे भारतात दरवर्षी १० लाख मृत्यू होतात. धूम्रपान दातांचे आरोग्य, फुफ्फुसे, हाडे आणि डोळ्यांवरही परिणाम करते.
धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन जीवघेणे असते ही बाब सगळ्यांना माहिती आहे.परंतु कँसर रिसर्च युकेमध्ये झालेल्या संशोधनाने तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. संशोधनानुसार पुढील पाच वर्षात धुम्रपानामुळे युकेमध्ये ३ लाख कँसरचे रुग्ण समोर येऊ शकतात. युके चॅरीटीच्या अंदाजानुसार २०२३ मध्ये युकेमध्ये प्रत्येक दिवशी जवळपास १६० कँसरची प्रकरणे धुम्रपानाशी संबंधित होती. चॅरीटीद्वारे प्रकाशित नवीन रिपोर्टमध्ये २०२९ पर्यंतच्या कँसरशी संबंधित प्रकरणांची माहिती दिली आहे. तंबाखूचे सेवन केल्याने जवळपास दोन तृतीयांश लोकांचा मृत्यू होतो. धुम्रपानाच्या परिणामाच्या गांभीर्याकडे कोणीही दुर्लक्ष करता कामा नये.
भारतात धुम्रपानाचे आकडे धक्कादायक आहेत. दरवर्षी तंबाखू उत्पादनांचे सेवन केल्याने जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू होत आहे. चीननंतर भारत असा देश आहे जिथे धूम्रपान करणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. केवळ धुम्रपानामुळे १० लाख वृद्धांचा मृत्यू भारतात होत आहे.
धुम्रपानामुळे खराब होतात दात: धूम्रपान केळ्यामुळे कमी वयातील लोकांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे. धुम्रपानामुळे फक्त दात आणि हिरड्याच खराब होत नाहीत तर व्यक्तीच्या आवडीच्या पदार्थांच्या स्वाद घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे.
फुफ्फुसात पसरतो संसर्ग: टार आणि हायड्रोजन साइनाइड सारखे विषारी वायू फुफ्फुस खराब करतात. या वायुमुळे फुफ्फुसात वेगाने संसर्ग होतो आणि खोकला येतो. श्वासाच्या संसर्गांमुळे व्यक्तीला व्यवस्थितपणे श्वास देखील घेता येत नाही.
धुम्रपानामुळे हाडांवर होतो परिणाम: धुम्रपानामुळे शरीरात निकोटिनचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे हाडे बनवणाऱ्या पेशींची निर्मिती देखील कमी होते. व्यक्तीची हाडे हळु हळु पातळ आणि नष्ट होऊ लागतात.
डोळ्यांवर वाईट परिणाम: सिगरेट मधील रसायनामुळे डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. धुम्रपानामुळे मोतीबिंदुचा धोका वाढतो.
हेही वाचा:
पोटाची चरबी कमी करायची?, सकाळी या पिवळ्या दाण्यांचे पाणी प्या!
मेथीच्या कडवटपणामुळे तोंडाची चव खराब होते का?, या 5 टिप्सने कडवटपणा दूर करा