जिम-डाएट प्लॅननंतर देखील घटणार नाही वजन, तात्काळ सोडा ही सवय

साखरेचे जास्त सेवन आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, ज्यामुळे वजन वाढणे, उच्च रक्तदाब आणि चेहऱ्यावर मुरुमे येणे अशा समस्या उद्भवू शकतात. गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी, मध किंवा गुळाचा वापर करा, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि फायबरयुक्त आहार घ्या.

Health tips: भारतात असे हजारो लोक आढळतील ज्यांची सकाळची सुरुवात कडक साखरेच्या चहाने तर रात्र रबडी-जिलेबी खाऊन होते. साखरेची तलफ अशी आहे जी दिवसेंदिवस वाढत जाते. साखर तात्काळ ऊर्जा देते परंतु साखरेतील उच्च कॅलरीज शरीराला नुकसान पोहचवतात. जर तुम्हालाही दर काही तासांनी गोड खाण्याची इच्छा होत असेल तर ही सवय बदलणे आवश्यक आहे. चला तर जाणुन घेऊ या तुम्ही या सवयीला कसे नियंत्रित करू शकता आणि फिट राहू शकता, याचबरोबर तुम्ही साखरेचे जास्त सेवन तर करत नाही ना हे ओळखा.

कमी खाल्ल्यानंतर देखील वजन वाढणे

तुम्ही कमी आहार घेता तरी देखील तुमचे वजन सतत वाढत असेल तर यामागे कॅलरी हे कारण आहे. साखर जरी स्वादिष्ठ असली तरी यात असणाऱ्या कॅलरी दोन वेळेच्या आहारा इतक्या असतात. साखरेचे जास्त सेवन भुक वाढवते. याने इन्सुलिन प्रणालीवरही परिणाम होतो, त्यामुळे पोटात चरबी जमा होते आणि वजन वाढू लागते.

उच्च रक्त दाब वाढणे

उच्च रक्तदाबाचे लक्षण हे तुम्ही जास्त साखरेचे सेवन करत असल्याचा संकेत आहे. प्रमाणापेक्षा जास्त साखरेचे सेवन करणे तेवढेच धोकादायक आहे. संशोधनानुसार, बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठापेक्षा जास्त साखरेवर नियंत्रण आवश्यक आहे.

चेहऱ्यावर पुरळ येणे

जास्त गोड खाल्ल्याने चेहऱ्यावर मुरुमे होतात. जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते. यामुळे त्वचेवर सुज येते आणि सेबम नावाच्या तेलकट पदार्थाचा स्राव होतो. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येतात.

साखर खाण्याची सवय कशी कमी करावी

१- साखर खाण्याची सवय सोडवणे थोडे अवघड आहे पण तुम्ही ते करू शकता. गोड खाण्याऐवजी मध किंवा गुळाचा आहारात समावेश करा. यामुळे तुमचे आरोग्यही चांगले राहील.

२- तुमच्या आहारात प्रथिने, हेल्दी कार्ब आणि फायबर यासारख्या गोष्टींचा समावेश करा. असे केल्याने तुम्हाला भूक कमी लागेल आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल आणि तुमची साखर खाण्याची इच्छा देखील कमी होईल.

३- आपण अनेकदा तहान आणि भुक यात गोंधळ करतो. जर तुम्हाला अवेळी तहान लागली तर भरपूर पाणी प्या. असे केल्याने तुमची भुकेची जाणीव नाहीशी होईल.

४- जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही किती कॅलरीज घेत आहात यावर लक्ष केंद्रित करा. याचबरोबर, जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होत असेल तर, तर फुड प्लॅन बनवा जेणेकरून अतिरिक्त कॅलरीज टाळता येतील.

५- बरेच लोक पातळ होण्यासाठी खाणे बंद करतात पण असे करणे हे अति खाण्यास प्रोत्साहन देते. अशा स्थितीत दिवसभर नाही तर एका वेळी जेवण करावे. जेणेकरून गोड खाण्याची इच्छा कमी होते.

आणखी वाचा-

ग्रीन टी च्या बॅग फेकून देण्याएवजी तयार करा हे 4 फेस पॅक, उजळेल त्वचा

थंडीतही आयस्क्रिमसारखे घरच्याघरी तयार करा दही, वाचा मास्टरशेफची खास टीप

Share this article