How to Store Bananas : केळी जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवण्यासाठी नेमके काय करावे? जाणून घ्या साध्या-सोप्या टिप्स
घरात काही नसेल आणि लवकरात लवकर भूक शमवायची असेल, तर यावर सर्वात हेल्दी पर्याय म्हणजे केळी खाणे. केळे हे फळ खाण्यासाठी ते स्वच्छ धुण्याची किंवा कापण्याचीही गरज नसते. महत्त्वाचे म्हणजे या फळामध्ये आरोग्यास आवश्यक असणाऱ्या कित्येक पोषणतत्त्वांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. म्हणूनच आहारतज्ज्ञ देखील केळ्याचे पॅनकेक्स, केळ्याचे शेक किंवा केळ्याचे सॅलेड खाण्याचा सल्ला देतात.
पण केळे हे फळ जास्तीत जास्त काळ टिकून राहत नाही. यामुळे बाजारातून केळी विकत आणल्यानंतर दोन दिवसांतच ती खाणे गरजेचं असते. अन्यथा केळी जास्त पिकून काळी पडतात आणि मग हे फळ खाण्यायोग्य राहत नाही. केळी जास्तीत जास्त काळ टिकू राहण्यासाठी सरासरी तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणं आवश्यक असते. त्यामुळे हिवाळा वगळता उन्हाळ्यात हे फळ टिकणं कठीणच. पण काही सोप्या घरगुती टिप्स जर आपण आजमावून पाहिल्या तर केळी दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत मिळू शकते. केळी जास्त काळ फ्रेश कशी ठेवायची? याबाबत आपण साध्या सोप्या घरगुती पद्धती जाणून घेऊया…
(रोज 1 एक कप प्या हे पाणी, निरोगी आरोग्यासाठी आहे अमृतासमान)
स्टेप 1 : बाजारातून विकत आणलेल्या केळीचा घड घ्या
स्टेप 2 : केळीचा घड एका हुकमध्ये अडकवा
केळी जलदगतीने पिकण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी केळीचा घड हुकमध्ये अडकवून झाडावर असल्याप्रमाणे एखाद्या उंच ठिकाणी लटकवून ठेवा.
हुक वापरून केळीचा घड हँगरवर लटकवून ठेवा. हँगरवर ठेवताना केळ्यांना कोणत्याही गोष्टीस स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. अगदी भिंतीचाही केळ्यांना स्पर्श होता कामा नये. केळीच्या घडाचा कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागास स्पर्श होण्यापासून रोखल्यास अॅसिडचे विघटन कमी होऊन फळ पिकण्याची प्रक्रिया मंद होण्यास मदत मिळले.
(पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? करा हे नैसर्गिक उपाय)
केळी टिकून राहण्यासाठी सरासरी तापमान 13 अंश सेल्सिअस इतके असणे गरजेचं आहे. यामुळे केळ्यांवर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घ्या तसंच किचनमधील उष्णतेपासूनही दूर थंडावा असलेल्या ठिकाणी केळ्यांचा घड लटकवावा. यामुळे केळी जास्त काळ टिकण्यास मदत मिळू शकते.
केळ्यांचे देठ फॉइलने गुंडाळल्यानंतर सर्व केळी फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुमच्या रूमच्या तापमानाच्या तुलनेत फ्रीजमध्ये ठेवलेली केळी जास्त काळ टिकतील. यामुळे फळाच्या चवीवर कोणताही परिणाम होणार नाही.
विकत आणलेले सामान वापराविना फेकून दिल्यास नुकसान झाल्याची भावना मनात येते. कारण पै-पै वाचवून आपण सर्व गोष्टी जमा करत असतो. त्यामुळे पिकलेली केळी देखील कचऱ्यात फेकणे कठीणच असते. पण काळवंडलेली केळी फेकण्याऐवजी आपण त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता.