Marathi

HEALTH TIPS

रोज 1 एक कप प्या हे पाणी, निरोगी आरोग्यासाठी आहे अमृतासमान

Marathi

आरोग्यवर्धक पाणी

जेवणानंतर मुखशुद्धी तसंच अन्नाचे पचन होण्यासाठी बडीशेप खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण बडीशेपमध्ये आरोग्यवर्धक गुणधर्मांचा साठा आहे.

Image credits: Getty
Marathi

पोषणतत्त्वांचा साठा

यामध्ये व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत. नियमित कपभर बडीशेपचे पाणी प्यायल्यास आरोग्यास कोणकोणते लाभ मिळू शकतात, जाणून घ्या सविस्तर

Image credits: Getty
Marathi

का प्यावे हे पाणी?

बडीशेपमध्ये झिंक, व्हिटॅमिन सी, लोह, सेलॅनियम, फायबर यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे.

Image credits: Getty
Marathi

बद्धकोष्ठतेपासून मुक्तता

नियमित एक कप बडीशेपचे पाणी प्यायल्यास पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

Image credits: Getty
Marathi

चेहऱ्यावरील डाग होतील कमी

बडीशेपच्या पाण्यात अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी बडीशेपचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे त्वचा  नितळ-चमकदार होण्यास मदत मिळते. 

Image credits: Getty
Marathi

डोळ्यांचे आरोग्य

डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित एक कप बडीशेपचे पाणी प्यावे. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहेत.

Image credits: Getty
Marathi

रक्तदाबाची समस्या राहते नियंत्रणात

बडीशेपच्या पाण्यात पोटॅशिअमचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. हे पाणी प्यायल्यास रक्तदाबाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळू शकते.

Image credits: Getty
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नियमित एक कप बडीशेपचे पाणी प्यावे. कारण यामध्ये 'व्हिटॅमिन सी' जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

वजन कमी होणे

बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीराचे वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. कारण यामध्ये फायबरचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या नियंत्रणात येते आणि शरीराचे वजनही कमी होते.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

सकाळी 12 सूर्य नमस्काराचा करा सराव, संपूर्ण शरीराला मिळतील हे लाभ

दररोज खा एक वाटी दही, शरीराला मिळतील हे लाभ

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्यास मिळतील हे अद्भुत लाभ

महिनाभर Aloe Vera ज्युस प्यायल्यास शरीरात कोणकोणते होऊ शकतात बदल?