Marathi

How To Lose Arm Fat

हातावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 10 व्यायाम

Marathi

कार्डियो

हातावरील चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे कार्डियो. यामध्ये कित्येक व्यायामांचा समावेश असतो. यामध्ये रनिंग, जॉगिंग, जम्पिंग, सायकलिंग इत्यादी व्यायाम प्रकार असतात.

Image credits: Getty
Marathi

वेट लिफ्टिंग

वेट लिफ्टिंगमुळे शरीर मजबूत होते. शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबी देखील कमी होण्यास मदत मिळते. यासह शरीराची चयापचयाची क्षमता देखील वाढते.

Image credits: Getty
Marathi

पुश अप

पुश अप करताना संपूर्ण शरीराचे वजन हातांवर असतो. यामुळे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो व अतिरिक्त चरबीही कमी होण्यास मदत मिळते. पुश अप करणं कठीण होत असेल तर वॉल पुश अप आपण करू शकता.

Image credits: Getty
Marathi

ट्रायसेप्स किकबॅक

ट्रायसेप्स किकबॅक व्यायाम करण्यासाठी डंबलचा वापर केला जातो. डंबल हातात पकडून लयबद्ध पद्धतीने हात पुढे-मागे करण्याची प्रक्रिया करावी लागते. 

Image credits: Getty
Marathi

ट्रायसेप्स प्रेस

ट्रायसेप्स प्रेस व्यायाम करण्यासाठी दोन्ही हातांमध्ये डंबल पकडून हात वर-खाली करावे. हात डोक्याच्या मागील बाजूस असावेत. यामुळे हाताचे स्नायू मजबूत होतात व चरबी देखील कमी होऊ शकते.

Image credits: Getty
Marathi

प्लँक

प्लँक करताना दोन्ही हातांवर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळावा लागतो. या व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत मिळू शकते.

Image credits: Getty
Marathi

बायसेप्स कर्ल

बायसेप्स कर्ल व्यायाम करण्यासाठीही डंबल हातात घेऊन हात लयबद्ध पद्धतीने वर-खाली करावेत.

Image credits: Getty
Marathi

ट्रायसेप्स डिप्स

ट्रायसेप्स डिप्स व्यायाम करण्यासाठी दोन्ही हात टेबलवर ठेवा, शरीर थोडेसे पुढे न्यावे. खुर्चीवर बसल्यासारखी स्थिती धारण करा. आता कंबर हळूहळू वर-खाली करावी.

Image credits: Getty
Marathi

ट्रायसेप्स स्विंग

ट्रायसेप्स स्विंग व्यायामामध्ये दोन्ही हातांमध्ये डंबल पकडावा. यानंतर हात खालील बाजूनं झोका दिल्यासारखे झुलवा. पण कोणतीही दुखापत होणार नाही, याची काळजी घ्यावी.

Image credits: Getty
Marathi

बॉक्सिंग

बॉक्सिंगसाठी एक पंचिंग बॅग-ग्लोव्ह्ज आवश्यक आहेत. या व्यायामामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? करा हे नैसर्गिक उपाय

जॉगिंगपूर्वी व जॉगिंगनंतर काय खावे आणि खाऊ नये? जाणून घ्या सविस्तर

सावधान ! तुम्हीही उभे राहून पाणी पिताय? होतील इतके गंभीर परिणाम

बदामाचे दूध पिण्याचे हे आहेत 8 फायदे