Marathi

WOMEN HEALTH

पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? मग हे नैसर्गिक उपाय करून पाहा.

Marathi

पोट दुखते का?

महिलांना पीरियड्सदरम्यान होणाऱ्या कित्येक समस्यांचा सामना करावा लागतो. यापैकीच एक त्रास म्हणजे पोट-ओटीपोटात क्रॅम्प्स येणे.

Image credits: Getty
Marathi

पेन किलर खाताय?

काही महिलांना पीरियड्सच्या दुसऱ्या दिवशी असह्य अशा वेदना होतात. या त्रासातून मुक्तता मिळवण्यासाठी काही जणी पेन किलर खातात.

Image credits: Getty
Marathi

घरगुती उपाय

पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांतून सुटका मिळवण्यासाठी पेन किलर खाणे टाळा. याऐवजी काही नैसर्गिक-घरगुती उपाय आपण करू शकता.

Image credits: Getty
Marathi

आले

मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या क्रॅम्प्सपासून सुटका हवी असेल तर आपण आल्याचा वापर करू शकता. आल्याचे छोटे तुकडे करून ते पाण्यात उकळा. हे पाणी प्यायल्यास वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते.

Image credits: Getty
Marathi

पपई

शारीरिक वेदना कमी करण्यासाठी आपण पपईचेही सेवन करू शकता. पपईमुळे शरीराची पचनप्रक्रिया सुधारते व पीरियड्सदरम्यान होणाऱ्या वेदनांपासूनही आराम मिळतो.

Image credits: Getty
Marathi

तुळशीची पाने

पोटात जास्तच दुखत असेल तर चहा तयार करताना त्यामध्ये तुळशीची काही पाने मिक्स करावीत. तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे पाळीत होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळू शकते.

Image credits: Getty
Marathi

ओवा

पीरियड्सदरम्यान काही जणींना गॅसच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे पोटदुखीचा त्रास निर्माण होतो. गॅसच्या समस्येवर उपाय म्हणून आपण ओव्याचे सेवन करू शकता.

Image credits: Getty
Marathi

हॉट वॉटर बॅग

पीरियड्समध्ये होणाऱ्या पोटदुखीची समस्या कमी करण्यासाठी हॉट वॉटर बॅगचा वापर करावा. यामुळे स्नायूंना आराम मिळेल व रक्तप्रवाहही सुधारेल. महत्त्वाचे म्हणजे पोटदुखी कमी होईल.

Image credits: Getty
Marathi

तज्ज्ञांचा सल्ला

Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: Getty