गटारी नव्हे दीप अमावस्या, जाणून घ्या तारखेसह दीपदान करण्याचे महत्व

Published : Jul 31, 2024, 12:32 PM ISTUpdated : Jul 31, 2024, 12:38 PM IST

Deep Amavasya 2024 :  दीप म्हणजेच दिव्याला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मियांमध्ये आषाढी आमावस्येला दीप अमावस्या किंवा गटारी अमावस्या असे म्हटले जाते. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. 

PREV
15
दीप अमावस्या 2024

दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी दीप पूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे अनेक चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे.

25
दीप अमावस्या का साजरी केली जाते?

आषाढ- श्रावण हे महिने पावसाळ्याच्या काळात येतात. आषाढ महिन्यातील काळोखी दिवस दूर सारून श्रावणासारखं मांगल्य, समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीप पूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते.आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्मियांच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणार्‍या महिन्याची सुरूवात होते. यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. 

35
दीप अमावस्या अशी करा साजरी

दीप अमावस्येला दीप पूजन केले जाते. या दिवशी घरातील पितळेचे, चांदीचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. त्यानंतर पाटावर स्वच्छ कापड पसरून दिव्यांची मांडणी करतात. दिवे तीळ्याच्या तेलात किंवा तुपाच्या वातीने प्रज्वलित केले जातात. या दिव्यांना फुलं, नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. दरम्यान अनेक ठिकाणी कणकेचे किंवा मातीचे दिवे लावून देखील दीप अमावस्या साजरी केली जाते. अनेक घरात या दिवशी पुरणाचे दिंड बनवून तो गोडाचा नैवेद्य बनवला जातो.

45
गटारी अमावस्या म्हणजे काय?

गटारी अमावास्येचं ‘खरं नाव’ आहे, ‘गतहारी’ अमावस्या! गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला हा शब्द म्हणजे गताहार. गत म्हणजे गेलेला, म्हणजेच गताहारचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो.श्रावण महिन्यात मद्यपान, मांसाहार अशा गोष्टी वर्ज्य असतात. याशिवाय श्रावण महिन्यात आपण यातील काहीही खात नाही. 

55
दीपदान का करतात?

दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असेही म्हटले जाते. या दिवशी दीपदान करण्याचे विशेष महत्व आहे.

  • अकाली मृत्यू टाळण्यासाठी दीपदान करावे.
  • माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी दीपदान करावे.
  • घरगुती वाद टाळ्यासाठी दीपदान केले जाते.
  • आयुष्यातील अंध:कार दूर होऊन प्रकाशाची वाट दिसण्यासाठी दीपदान करावे.
  • धन-समृद्धी टिकून राहण्यासाठी दीपादान केले जाते.
     

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

तब्बल 71 वर्षांनी श्रावणाची सुरुवात आणि शेवट सोमवारीच होणार

August 2024 Festival List : ऑगस्ट महिन्यात श्रावणासह सणवारांची लिस्ट पाहा

Recommended Stories