सार
महाशिवरात्रीचा हिंदू धर्मात फार मोठे महत्व आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला आहे. यानिमित्त पूजाविधी आणि शुभ मुहूर्तासह धार्मिक महत्व सविस्तर जाणून घेऊया.
Mahashivratri 2025 : हिंदू धर्मात महाशिवरात्री मोठ्या भक्तीभावाने साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा-प्रार्थना करतात. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते. असे म्हटले जाते की, भगवान शंकराची भक्तीभावाने पूजा केल्यास त्याचे आशीर्वाद मिळतात. जाणून घेऊया महाशिवरात्री साजरी करण्यामागील धार्मिक महत्व, शुभ मुहूर्त आणि पूजा-विधीबद्दल सविस्तर...
का साजरी करतात महाशिवरात्री?
धार्मिक मान्यतेनुसार, महाशिवरात्रीवेळी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. एका दुसऱ्या धार्मिक मान्यतेनुसार, फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या रात्री आदिदेव भगवान शंकर कोट्यावधी सूर्यांचा समान प्रभाव असणाऱ्या ज्योतिर्लिंगाच्या रुपात प्रकट झाले होते. या दिवशी शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक आणि मंत्र जाप केल्याने त्यांचे आशीर्वाद मिळतात.
शुभ मुहूर्त आणि तिथी
महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, यंदा महाशिवरात्री 26 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 26 फेब्रुवारीला सकाळी 11.08 वाजता सुरू होणार असून 27 फेब्रुवारीला सकाळी 08.54 वाजता संपणार आहे.
महाशिवरात्रि 2025 शुभ योग आणि नक्षत्रm
- परिघ योग : 26 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजून 8 मिनटांपासून
- शिव योग : 27 फेब्रुवारीला पहाटे 2 वाजून 58 मिनटांनी
- श्रवण नक्षत्र : 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 05:23 वाजेपर्यंत
- धनिष्ठा नक्षत्र : 26 फेब्रुवारीला संध्याकाळी 05:23 वाजल्यापासून सुरुवात
(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
Mahashivratri 2025 च्या उपवासाला तयार करा मखानाचे हे 5 पदार्थ
Chanakya Niti: या 8 गोष्टी कुटुंबापासून लपवून ठेवा, तरच मिळेल यश