Chaturmas 2024 : पुढील चार महिने शुभ कार्य करणे वर्ज्य, वाचा चातुर्मासातील नियम

Chaturmas 2024 : 17 जुलैला देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे. या दिवसापासून भगवान विष्णू चार महिन्यांसाठी निद्राव्यस्थेत जातात. यामुळे चातुर्मास काही शुभकार्ये पार पाडली जात नाही. अशातच चातुर्मासवेळी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दल जाणून घेऊया...

Chaturmas 2024 Date and Rules : प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीपासून चातुर्मासला सुरुवात होते. चातुर्मास पुढील चार महिन्यांपर्यंत असून कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीपर्यंत असतो. या काळात भगवान विष्णू निद्राव्यस्थेत जातात. यामुळे संपूर्ण सृष्टी भगवान शंकर संचालन करतात. चातुर्मासात श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक महिन्याचा समावेश आहे.

चातुर्मासात शुभकार्ये करणे वर्ज्य असते. यामुळे मुंडण, लग्नसोहळा, यज्ञोपवीतसारखी 16 कार्ये केली जात नाहीत. देवउठनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्राव्यस्थेतून उठतात. यानंतरच शुभकार्यांना सुरुवात होतो.

कधीपासून सुरु होणार चातुर्मास?
हिंदू पंचांगानुसार यंदा चातुर्मास बुधवार (17 जुलै) पासून सुरु होत आहे. चातुर्मास चार महिन्यांसाठी असणार आहे. यानंतर 12 नोव्हेंबरला जेव्हा देवउठनी एकादशी साजरी केली जाणार तेव्हा भगवान विष्णू निद्राव्यस्थेतून उठणार आहेत. यावेळीच चातुर्मास संपणार आहे.

शुभ कार्ये करणे वर्ज्य
चातुर्मासातील चार महिन्यांमध्ये शुभ कार्ये करणे पूर्ण वर्ज्य असते. यावेळी साखरपुडा, लग्नसोहळा, मुंडण, कर्णवेध संस्कार आणि गृह प्रवेश अशी शुभ कार्ये केली जात नाही. देवउठनीच्या एकादशीनंतर सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते. यंदा देवउठनी एकादशी 12 नोव्हेंबरला आहे.

व्रत आणि पूजा-प्रार्थना
चातुर्मासावेळी व्रत आणि पूजा-प्रार्थनेला फार महत्व आहे. चातुर्मासातील चार महिन्यांमध्ये साधू संत आपल्या यात्रा करत नाही. ते मंदिर अथवा आपल्या मूळ ठिकाणी राहूनचे उपवास आणि पूजा-प्रार्थना करतात. यावेळी केवळ ब्रज धामची यात्रा केली जाऊ शकते.

काय खावे आणि काय नाही?
चातुर्मासावेळी मांसाहर, मद्यपान केले जात नाही. याशिवाय तामसिक पदार्थ खाणे टाळावे असे सांगितले जाते. चातुर्मासात भोजन सात्विक असावे.

देवशयनी एकादशीचे महत्व
देवशयनी एकादशीला व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपमधून मुक्ती मिळते असे मानले जाते. भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. धार्मिक मान्यतांनुसार, एकादशीचे व्रत ठेवल्याने व्यक्तीला सर्व सुख मिळतात आणि जीवनाचा शेवट मोक्षाने होतो.

(DISCLAIMER : लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

Devshayani Ekadashi 2024 : भगवान विष्णूंच्या पूजा-विधीसह शुभ मुहूर्ताबद्दल घ्या जाणून, होतील सर्व इच्छा पूर्ण

Ashadhi Akadashi 2024 निमित्त मित्रपरिवाराला खास संदेश पाठवून करा विठूरायाचा गजर

Share this article