कोविशिल्डची लस घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी! शरिरावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल AstraZeneca कंपनीने केला मोठा खुलासा

AstraZeneca : कोरोना महासंकटावेळी नागरिकांना कोविशिल्डची लस देण्यात आली. अशातच एस्ट्रेजेनेका कंपनीनेच लसीचे शरिरावर होणाऱ्या परिणामांबद्दल खुलासा केला आहे.

AstraZeneca : कोविडच्या काळात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या कोविशिल्ड लसीचा शरिरावर दुष्परिणाम होत असल्याचे आरोप अनेकवेळा करण्यात आले. अशातच लसीची निर्मिती करणारी कंपनी एस्ट्राजेनेकाने एक मोठा खुलासा केला आहे. कंपनीने कोर्टासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमधून पहिल्यांदाच मान्य केलेय की, कोविड-19 (COVID-19) वरील लसीमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. पण अशा प्रकरणांची संख्या फार कमी असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.

कोविशील्ड आणि वॅक्सजेवरिया नावाने लसीची जगभरात विक्री
कोरोना महासंकटावेळी संपूर्ण जगभरात ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका कोविड लसीला कोविशिल्ड (Covishield) आणि वॅक्सजेवरिया (Vaxzevria) नावासह काही नावांनी विक्री करण्यात आली. सध्या लसीमुळे होणाऱ्या मृत्यूसह काही गंभीर आजारांसंदर्भात एस्ट्रेजेनेकाच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. कंपनीवर असा आरोप लावण्यात आला की, एस्ट्रेजेनेका कंपनीने ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या मदतीने जी लस तयार केलीय त्याचे शरिरावर काही दुष्परिणाम होत आहेत.

कोर्टात कंपनीच्या विरोधात खटला दाखल
काही कुटुंबांनी कोर्टात कंपनीच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्यावेळी असा आरोप लावण्यात आला होता की, एस्ट्राजेनेका लसीमुळे शरिरावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. कंपनीने आपली चूक मान्य केलीय ही बाब फार महत्त्वाची आहे. कारण लसीमुळे शरिरावर दुष्परिणाम होऊ शकतात हे स्पष्ट झालेय. याच प्रकरणासंदर्भात जॅमी स्कॉटने खटला दाखल केला होता. त्यांनी एप्रिल 2021 मध्ये एस्ट्राजेनेका लस घेतली होती. यानंतर जॅमींना मेंदूसंबंधित समस्यांचा सामना करावा लागत आहे.

लसीमुळे शरिरावर असे झाले परिणाम
जॅमी स्कॉट यांच्यासह अन्य रुग्णांच्या प्रकरणांमध्ये थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसह (Thrombocytopenia Syndrome) थ्रोम्बोसिस (Thrombosis) नावाच्या दुर्मिळ परिणामाची बाब समोर आली. या सिंड्रोममुळे रक्तात गुठळ्या तयार होणे आणि शरिरातील पेशी कमी होण्याची समस्या निर्माण होते. एस्ट्राजेनेका कंपनीकडून युकेमधील उच्च न्यायालायत सादर करण्यात आलेल्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये म्हटलेय की, लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमसारखे परिणाम शरिरावर होऊ शकतात. पण याची शक्यता फार कमी देखील आहे.

भारतात कोविशील्ड नावाने लसीची विक्री
एस्ट्रेजेनेका कंपनीने भारत सरकारला कोरोनाच्या काळात लसीचा पुरवठा केला होता. यासाठी कंपनीने जगभरातील सर्वाधिक मोठी लस निर्माता कंपनी सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. सीरम इंस्टिट्युटसह मिळून कोविशील्ड नावाची लस कोरोनावर मात करण्यासाठी तयार करण्यात आली होती. याशिवाय भारतातील नागरिकांना कोरोनाच्या काळात कोविशील्ड लसच दिली गेली होती.

आणखी वाचा :

Breast cancer:अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

तणावामुळे खरंच वजन कमी होतो का?

Share this article