Lifestyle

तणावामुळे खरंच वजन कमी होतो का?

Image credits: Getty

मानसिक आरोग्यावर परिणाम

आजकाल धावपळीच्या आयुष्यामुळे मानसिक आरोग्य बिघडले जाते. यामुळे शरिरात काही बदल झालेले दिसून येतात. अशातच तणावामुळे वजन कमी होतो का? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

Image credits: pexels

खाण्यापिण्याच्या सवयीत बदल

तणावाखाली असलेल्या व्यक्तीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीत बदल झाल्याचे दिसून येते. काहीजण तणावात असताना ओव्हरइटिंग करतात. तर काहींना काहीच खाण्यापिण्याचे मन होत नाही.

Image credits: Getty

तणावामुळे वजन कमी होते?

तणावाखाली असलेला व्यक्ती अत्याधिक खात असल्याने त्याचे वजन वाढले जाऊ शकते. पण खाणपिणे कमी केल्यास वजनही कमी होऊ शकते.

Image credits: pexels

भूकेवर होतो परिणाम

शरिरात कोर्टिसोल नावाचा एक स्ट्रेस हार्मोन असतो. या हार्मोनचा भूकेवर परिणाम होतो. अशातच व्यक्तीला काही खाण्याची इच्छा किंवा भूक लागत नाही. 

Image credits: Getty

तणावामुळे आजारपण मागे लागते

गरजेपेक्षा अधिक तणाव घेतल्याने आजारपण मागे लागू शकते. लठ्ठपणा आणि मधुमेहासरखे आजार उद्भवू शकतात.

Image credits: Getty

पचनक्रियेवर होतो परिणाम

तणाव घेतल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे झोपही व्यवस्थितीत पूर्ण होत नाही आणि वजन कमी होऊ शकते.

Image credits: Getty

एक्सरसाइज करा

तणावापासून दूर राहण्यासाठी दररोज एक्सरसाइज करा. याशिवाय हेल्दी डाएटचेही सेवन करा.

Image credits: Freepik

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty