Breast cancer:अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला स्तनाचा कर्करोग जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

| Published : Apr 28 2024, 08:06 AM IST

breast cancer

सार

स्तनामध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणारा सर्वात गंभीर आजार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

स्तनामध्ये, दुग्धग्रंथीमध्ये आढळणारा कॅन्सर हा स्त्रीयांमध्ये होणारा सर्वात गंभीर आजार आहे. याचे प्रमाण 30 वर्षानंतरच्या स्त्रीयांमध्ये, स्तनपान न करणाऱ्‍या स्त्रीयांमध्ये, रजोनिवृत्ती झालेल्या तसेच अविवाहित स्त्रियांमध्ये अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो असे संशोधकांनी म्हंटले आहे.

बहुतांश वेळेला स्त्रीला स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाला आहे हे कळतच नाही. जेव्हा कळतं तेव्हा उशिर झालेला असतो. आज भारतीय स्त्रियांना होणा-या कर्करोगाच्या प्रकारांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि सुमारे 13 लाख स्त्रीया या स्तनांच्या कर्करोगाने पिडित आहेत. स्त्रियांना गर्भाशयाच्या अस्तराचा, बीजांडकोषाचा असे काही कर्करोग होतात परंतु या सर्वात स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण खूप मोठे आहे. स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका अंदाजे नऊपैकी एका स्त्रीला असतो.

प्रारंभीक अवस्थेत याचे निदान झाल्यास त्रासातून मुक्तता मिळते. यासाठी वयाच्या 30-40 वर्षानंतर स्तनांची नियमितरित्या वर्षातून किमान एकदा स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे. याशिवाय स्वतःद्वारा स्तन परिक्षण करुन स्तनांच्या ठिकाणी गाठ किंवा असमान्य वृद्धी नसल्याची खात्री करुन घेण गरजेचे आहे. स्वतः तपासणी केल्यानंतर जर स्तनप्रदेशी असामान्य वृद्धी, गाठ स्पर्शास जाणवल्यास तात्काळ स्त्रीरोग तज्ञांशी संपर्क साधावा. जेणेकरुन स्तन कॅन्सरचे वेळीच निदान होईल आणि प्राथमिक अवस्थेतच कॅन्सरला थांबवता येईल.

ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण तरूणींमध्येही :

पन्नाशीनंतर होणा-या या कर्करोगाचे प्रमाण आज 20 ते 35 वयोगटांतील तरुणींमध्ये प्रचंड वाढत असल्याचे आढळून आले आहे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, आरोग्याकडे दुर्लक्ष आणि कामाचा अतिरिक्त ताण यांमुळे महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक तरूण स्त्रीला हा धोका असतोच परंतु यापूर्वी म्हणजे गेल्या दशकात 50 व 55 पेक्षा अधिक वय असलेल्या प्रौढ महिलांमध्ये हा कर्करोग आढळायचा, ते वय आता 30 ते 35 इतकं घसरलं आहे.

स्तनाचा कर्करोग लक्षणे :

  • स्तनात गाठ
  • अचानक स्तनाचा आकार वाढणे व स्तन घट्ट होणे
  • स्तनाला‎ वेदना होणे.
  • ‎स्नायूंच्या वेदना, पाठ दुखी, दुर्बलता ही लक्षणे स्तनाच्या कँसरमध्ये जाणवू शकतात.
  • ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कुणाला..?
  • वयाच्या पंचवीशीनंतर प्रत्येक स्त्रीला याचा धोका असतो. 

स्तनाचा कर्करोग कशामुळे होतो..?

  • अनुवंशिक कारणांद्वारे स्तन कॅन्सर होण्याची अधिक शक्यता असते.
  • ‎वयाच्या 12 व्या वर्षापुर्वीच मासिक पाळी सुरु झालेली असल्यास,
  • वयाच्या 55 व्या वर्षानंतर रजोनिवृत्ती झाल्यास,
  • ‎निसंतती, वंधत्वाची समस्या असणे,
  • कुटुंबनियोजन औषधांच्या अतिरेकामुळे,
  • आपल्या बाळास स्तनपान न करणाऱ्‍या महिला,
  • व्यसनाधिनतेमुळे 
  • ‎लठ्ठपणा असणाऱ्‍या महिला