थंडीच्या दिवसात मुळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सर्दी-खोकल्यासह लठ्ठपणाची समस्या असल्यास मुळ्याचे सेवन करू शकता. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात मुळ्याचे सेवन केल्याने कोणत्या समस्या दूर होतात याबद्दल सविस्तर...
Radish Benefits for health : मुळ्याचे सेवन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. डाएटमध्ये सॅलड किंवा भाजीच्या रुपात मुळ्याचे सेवन केल्याने काही आरोग्यदायी फायदे होतात. खरंतर, थंडीच्या दिवसात मुळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असणारे पोषण तत्त्वे आरोग्याला सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. जाणून घेऊया याबद्दलच सविस्तर...
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. थंडीच्या दिवसात सर्दी-खोकलासारख्या समस्या वाढल्या जातात. अशातच मुळ्याचे सेवन करावे. व्हिटॅमिन सी शरिराला बॅक्टेरिया आणि संक्रमण आजारांशी लढण्यास मदत करतात. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
पचनक्रिया सुधारते
मुळ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचनक्रिया सुधारली जाते. पोटाच्या समस्या जसे की, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी अशा गोष्टींपासून दूर राहता. मुळ्याचे नियमित सेवन केल्याने आतड्या स्वच्छ राहतात. याशिवाय खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यास मदत होते.
वजन कमी होण्यास मदत
मुळ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खू असल्याने वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये त्याचा समावेश करू शकता. यामध्ये पाणी आणि फायबरही असल्याने पोट भरल्यासारखे राहते.
बॉडी डिटॉक्स होण्यास मदत
मुळा शरिरासाठी नैसर्गिक रुपात डिटॉक्सिफाइंग एजेंटच्यारुपात काम करतो. यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात जे शरिरातील हानिकाराक विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. मुळ्याचे सेवन केल्याने यकृत आणि किडनीची कार्यक्षमता उत्तम होते.
त्वचेसाठी फायदेशीर
मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्वचा हाइड्रेट राहण्यासाठी आणि शरिरात रक्तपुरवठा सुरळीत राहण्यासाठी मदत होते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो. त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यास थंडीत मुळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
वयाच्या 40 नंतर महिलांनी डाएटमध्ये करा या 6 पोषण तत्त्वांचा समावेश, रहाल हेल्दी
शरिरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास दिसू लागतात हे 5 संकेत