तेलकट आणि तळलेल्या पदार्थांसाठी आपण काही प्रकारचे तेल वापरतो. यामुळे पदार्थांची चवही वाढली जाते. पण आरोग्याच्या दृष्टीने तेलकट पदार्थांसाठी कोणत्या तेलाचा वापर करावा हे माहितेय का?
4 healthy cooking oil : समोसे, वडे किंवा चिप्ससारखे तेलकट पदार्थ पाहून प्रत्येकाचे ते खाण्याचे मन करते. तेलकट पदार्थ खाण्याची इच्छा होणे सामान्य बाब आहे. पण या पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या तेलामध्ये अत्याधिक प्रमामात फॅट्स, ट्रान्स फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल असते. यामुळे वजन वाढणे ते हृदयरोगासंबंधित समस्या अधिक वाढल्या जाऊ शकतात. दरम्यान, डीप फ्राइड पदार्थांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हेल्दी असणाऱ्या तेलाचा वापर केल्यास तेलकट पदार्थ खाताना भीती देखील वाटणार नाही. अशातच तेलकट किंवा तळणीच्या पदार्थांसाठी कोणत्या प्रकारचे तेल वापरावे याबद्दल जाणून घेऊया. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, तूप, रिफाइंड कॅनोला तेल, रिफाइंड कोकोनट तेल आणि पीनट ऑइल अशा हेल्दी कुकिंग ऑइलचा वापर करा. यामुळे आरोग्यही राखले जाईल.
शेंगदाण्याचे तेल
शेंगदाण्याच तेल अधिक तापमानावर गरम केल्यास तरीही ते सुरक्षित आहे. डीप फ्राइड फूड्ससाठी शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करू शकता. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते जे त्वचा आणि केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्सही असतात जे कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासह हृदयासंबंधित समस्या दूर ठेवतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाण्याच्या तेलाचा पदार्थांसाठी वापर करू शकता.
रिफाइंड नारळाचे तेल
रिफाइंड नारळाच्या तेलामध्ये हेल्दी फॅटी अॅसिड असतात ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या कमी होते. यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडेंट्समुळे शरीराला फ्री रेडिकल्सपासून बचाव होतो. याशिवाय बॅड कोलेस्ट्ऱल कमी करुन कोलेस्ट्रॉलचा स्तर समतोल ठेवण्याचे काम रिफाइंड नारळाचे तेल करते.
हेही वाचा :
तेलाशिवाय बनवा हेल्दी गाजर-मुळ्याचे लोणचे, जाणून घ्या रेसिपी
एक्सरसाइजनंतर खा हे 5 स्नॅक्स, थकवा होईल दूर
लो फॅट रिफाइंड कॅनोला ऑइल
रिफाइंड कॅनोला तेलामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 असते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. अन्य तेलांच्या तुलनेत रिफाइंड कॅनोला तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स कमी असतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी लो फॅट रिफाइंड कॅनोला ऑइलचा वापर करू शकता. याशिवाय शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करुन हृदयाचे या तेलामुळे आरोग्य राखले जाते.
तूप
तूपामध्ये हेल्दी सॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे आरोग्यासाठी आवश्यक आहेत. तूपाचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढला जातो आणि पचनक्रिया सुधारली जाते. तूपामध्ये ब्युटिरिक अॅसिड असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तूपामध्ये काही प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जसे की, व्हिटॅमिन ए, ई, डी आणि के असते. जे शरीराला पोषण देतात. समोसे किंवा वड्यांसाठी तूपाचा वापर करू शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
आणखी वाचा :
केसांना मोहरीचे तेल लावण्याचे 5 फायदे, आठवड्याभरात दिसेल फरक