लोणच्याचे नाव काढले की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. पण तेलाशिवाय गाजर-मुळ्यामध्ये लोणचे कसे तयार करायचे याबद्दल जाणून घेऊया...
2 गाजर, 2 मुळा, हिरव्या मिरची, राईची पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ चवीनुसार, व्हिनेगर, हिंग आणि हळद.
सर्वप्रथम गाजर आणि मुळा स्वच्छ धुवून त्याचे उभ्या आकारात पातळ तुकडे करुन घ्या. यानंतर यामधील पाणी पूर्णपणे काढून टाकण्यासाठी सुती कापडावर पसरवा.
कापलेल्या भाज्या एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये हळद, मसाले, हिंग, राईची पावडर घालून मिक्स करा.
लोणच्याच्या मिश्रणात व्हिनेगर मिक्स करुन घ्या. जेणेकरुन लोणचे दीर्घकाळ टिकले जाईल.
लोणचे झाकणबंद डब्यामध्ये किंवा काचेच्या जारमध्ये भरुन ठेवून 1-2 दिवस उन्हामध्ये ठेवा.
उन्हात ठेवल्यानंतर भाज्या खराब होत नाही. अशाप्रकारे तेलाशिवाय तयार केलेले लोणचे भात किंवा पोळीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
पार्टीची थाट आणि वैभव वाढेल, या 6 स्टायलिश पादत्राणांनी सजवा तुमचे पाय
वराची नजर वधूवर खिळणार, Kriti Sanon ने घाला हैवी इयरिंग्स
पापुदऱ्यासारखा डोसा घरच्या घरी कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या
लाल रंगातील साडीवर परफेक्ट मॅच होतील या 7 शेड्सच्या Lipsticks