MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • National Flag : जगातल्या या एकमेव देशाचा राष्ट्रध्वज आहे दोन त्रिकोणांचा! जाणून घ्या यामागचं कारण

National Flag : जगातल्या या एकमेव देशाचा राष्ट्रध्वज आहे दोन त्रिकोणांचा! जाणून घ्या यामागचं कारण

जगातील सर्व देशांचे राष्ट्रध्वज आयताकृती असतात, पण नेपाळचा राष्ट्रध्वज मात्र याला अपवाद आहे. नेपाळचा झेंडा दोन त्रिकोणांचा का बनलेला असतो? या अनोख्या झेंड्याची खासियत काय आहे, ते जाणून घेऊया.

3 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Nov 12 2026, 06:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
असा आहे नेपाळचा झेंडा
Image Credit : Gemini AI సాయంతో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

असा आहे नेपाळचा झेंडा

जगातील प्रत्येक देशाचा आपला असा एक स्वतंत्र राष्ट्रध्वज असतो. झेंड्यातील रंग, चिन्ह आणि आकार त्या देशाचा इतिहास, संस्कृती आणि ओळख सांगत असतात. काही झेंड्यांमध्ये तीन रंग असतात, तर काहींमध्ये चंद्र, सूर्य किंवा ताऱ्यांची चिन्हं दिसतात. रंग आणि चिन्हं वेगळी असली तरी बहुतांश सर्व देशांचे झेंडे हे आयताकृतीच असतात. पण नेपाळने मात्र या परंपरेला छेद देत आपला वेगळा झेंडा तयार केला आहे.

नेपाळचा राष्ट्रध्वज पाहिला तर तो दोन त्रिकोण एकमेकांवर ठेवल्यासारखा दिसतो. इतर देशांचे झेंडे चारही बाजूंनी समान असणाऱ्या आयताच्या आकारात असतात, तिथे नेपाळचा झेंडा मात्र आपल्या या अनोख्या आकारामुळे जगभरात ओळखला जातो. पण नेपाळचा झेंडा असा का आहे? या दोन त्रिकोणांमागचा इतिहास काय? यातील रंग आणि सूर्य-चंद्राच्या चिन्हांचा अर्थ काय? याबद्दलची रंजक माहिती जाणून घेऊया.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
जगातील सर्वात वेगळा राष्ट्रध्वज
Image Credit : X/IRCTC

जगातील सर्वात वेगळा राष्ट्रध्वज

इतर देशांच्या तुलनेत नेपाळचा राष्ट्रध्वज पूर्णपणे वेगळा आहे. हा झेंडा दोन वेगवेगळ्या त्रिकोणी भागांनी बनलेला आहे. वरचा त्रिकोण खालच्या त्रिकोणापेक्षा थोडा लहान असतो. हे दोन्ही भाग एकमेकांवर जोडलेले दिसतात. झेंड्याच्या कडेने निळ्या रंगाची पट्टी असते. तर आतील भाग लाल रंगाचा असतो. वरच्या त्रिकोणात पांढऱ्या रंगाची चंद्रकोर आणि खालच्या त्रिकोणात पांढऱ्या रंगाचा सूर्य आहे.

या अनोख्या आकारामुळेच नेपाळच्या झेंड्याला जगातील सर्व देशांच्या झेंड्यांमध्ये एक वेगळं स्थान मिळालं आहे. आयताकृती नसलेला राष्ट्रध्वज अधिकृतपणे वापरणारा नेपाळ हा एकमेव सार्वभौम देश आहे.

दोन त्रिकोणांमागचा इतिहास काय?

नेपाळच्या झेंड्याच्या आकारामागे शतकांचा इतिहास असल्याचं सांगितलं जातं. पूर्वी नेपाळवर राज्य करणाऱ्या राजघराण्यांनी आणि राजांनी त्रिकोणी आकाराचे झेंडे वापरल्याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. हिंदू आणि बौद्ध परंपरांमध्ये त्रिकोणी झेंड्यांना विशेष महत्त्व आहे. मंदिरे, धार्मिक कार्यक्रम आणि राजघराण्यांच्या ओळखीसाठी असे झेंडे वापरले जायचे.

कालांतराने हे दोन त्रिकोण नेपाळच्या राष्ट्रीय ओळखीचा भाग बनले. हा आकार देशाचा इतिहास आणि परंपरेचं प्रतीक बनला. १९६२ मध्ये नेपाळच्या संविधानात राष्ट्रध्वजाच्या रचनेचे तपशील अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले. आजही नेपाळचा तोच अनोखा राष्ट्रध्वज वापरला जातो.

Related Articles

Related image1
Manchester City Appeal: मँचेस्टर सिटीचा प्रीमियर लीगच्या निर्णयाविरोधात अपील, काय आहे प्रकरण?
Related image2
Yellow City : जगाच्या मार्केटवर राज्य करणारी आपली 'हळदीची राजधानी' कोणती? भारतात आहे यलो सिटी
33
झेंड्यातील लाल आणि निळ्या रंगाचा अर्थ काय?
Image Credit : X/Nepal Flag

झेंड्यातील लाल आणि निळ्या रंगाचा अर्थ काय?

नेपाळच्या राष्ट्रध्वजात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक रंगाला विशेष महत्त्व आहे. यातील लाल रंग हा त्यांचा राष्ट्रीय रंग मानला जातो. तो धैर्य आणि विजयाचं प्रतीक आहे. नेपाळचं राष्ट्रीय फूल 'लालीगुरांस' (Rhododendron) हे सुद्धा लाल रंगाचंच असतं. तर झेंड्याच्या कडेला असलेला गडद निळा रंग शांतता आणि एकतेचं प्रतीक मानला जातो.

वरच्या त्रिकोणातील चंद्रकोर आणि खालच्या त्रिकोणातील सूर्याचं चिन्हही खास आहे. चंद्र हा शांतता आणि शितलतेचं प्रतीक मानला जातो, तर सूर्य हा ऊर्जा, उष्णता आणि खंबीरपणाचं प्रतीक आहे. जोपर्यंत आकाशात सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत नेपाळ देश अबाधित राहावा, अशी या चिन्हांमागची भावना आहे.

नेपाळच्या झेंड्यावरील चिन्हांची खासियत

या झेंड्याचं बारकाईने निरीक्षण केल्यास चंद्रकोरीत १६ पैकी ८ किरणं दिसतात. तसेच खालच्या भागातील सूर्याला १२ किरणं आहेत. या तपशीलांचा स्पष्ट उल्लेख नेपाळच्या संविधानातील कलम ८ मध्ये करण्यात आला आहे. एवढंच नाही तर हा झेंडा कोणत्या मापाचा आणि कसा बनवायचा हे सुद्धा संविधानाच्या अनुसूची १ मध्ये स्पष्ट केलं आहे. म्हणजेच हा झेंडा फक्त आकारानेच वेगळा नाही, तर त्याच्या निर्मितीचेही विशिष्ट नियम आहेत.

थोडक्यात सांगायचं तर, नेपाळचा राष्ट्रध्वज ही केवळ देशाची ओळख नाही, तर तो देशाचा इतिहास, परंपरा, संस्कृती आणि राष्ट्रीय भावनांचं प्रतीक आहे. म्हणूनच जगातील इतर सर्व देशांचे झेंडे एकाच प्रकारचे असले तरी, नेपाळचा झेंडा आपल्या अनोख्या आकारामुळे वेगळा ठरतो.

World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जागतिक बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Viral Monkey Video : आठवतोय का हा माकड? व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा कसा बदललाय (WATCH)
Recommended image2
Alaska UFO sighting : अमेरिकेतील अलास्कामध्ये दिसला जेलीफिशसारखा UFO? व्हिडिओ पाहून लोक चक्रावले
Recommended image3
Donald Trump : 'पराभूत झाल्यावर कसं वाटतंय?'; पत्रकाराच्या प्रश्नावर ट्रम्प यांची बोलती बंद
Recommended image4
Delhi Metro: दिल्ली मेट्रो लंडन अंडरग्राउंडपेक्षाही भारी! परदेशी प्रवाशाने शेअर केला व्हिडीओ
Recommended image5
Apartment Deal: अवघ्या १५५ रुपयांत चीनमध्ये माणसाने खरेदी केला 2-BHK फ्लॅट, वाचा काय आहे भानगड?
Related Stories
Recommended image1
Manchester City Appeal: मँचेस्टर सिटीचा प्रीमियर लीगच्या निर्णयाविरोधात अपील, काय आहे प्रकरण?
Recommended image2
Yellow City : जगाच्या मार्केटवर राज्य करणारी आपली 'हळदीची राजधानी' कोणती? भारतात आहे यलो सिटी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved