क्रिसमस स्टॉकिंगमधील लॉटरी तिकिटाने महिला कोट्यधीश!

| Published : Jan 03 2025, 09:02 PM IST

क्रिसमस स्टॉकिंगमधील लॉटरी तिकिटाने महिला कोट्यधीश!
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

क्रिसमस स्टॉकिंगमध्ये मिळालेल्या लॉटरी तिकिटाने एका महिलेने $150,000 (₹1.28 कोटी) जिंकले आहेत. टेलर कॅफ्री या महिलेला तिच्या आईने हे तिकीट भेट म्हणून दिले होते.

नवदिल्ली : क्रिसमस स्टॉकिंग्ज म्हणजे काय ते आधी सांगतो. क्रिसमसच्या वेळी घराच्या खिडक्यांना छोटे छोटे सॉक्स टांगलेले असतात. ते कोणीही काढू शकतो. त्यात सांता क्लॉज काहीतरी गिफ्ट ठेवतो अशी समजूत परदेशात आहे. अमेरिकेतील लोवा येथील एका महिलेने क्रिसमसच्या उत्साहात काढून आणलेले सॉक्स गेल्या महिन्यात तपासले. त्यात तिला एक लॉटरी तिकीट मिळाले. लॉटरी तिकीट मिळाल्याने सुरुवातीला त्या महिलेला आनंद झाला नाही. पण, हे लॉटरी तिकीट स्क्रॅच केल्यावर तिचे नशीबच पालटले. हो तिने स्क्रॅच केलेली लॉटरी तिला तब्बल 1.50 लाख डॉलर म्हणजेच 1 कोटी 28 लाख 67, 577.50 पैसे जिंकवून दिली. क्रिसमस स्टॉकिंगमधून तिने काढलेल्या लॉटरी तिकिटाने तिला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळवून दिले आणि ती रात्रीतून कोट्यधीश झाली.

टेलर कॅफ्री या महिलेच्या विजयाची घोषणा करणाऱ्या लॉटरी कंपनीच्या सोशल मीडिया पेजवर, 'ग्रिम्सच्या टेलर कॅफ्री यांनी या वर्षीच्या क्रिसमस स्टॉकिंगमध्ये मनी गिफ्ट स्क्रॅच तिकीट मिळवले होते. या लॉटरी तिकिटाने $150,000 चे बक्षीस जिंकले आहे. सांता (ती खरंच तिची आई होती) वेस्ट डेस मोइन्स येथील हाय-वी फास्ट अँड फ्रेश, 9150 SE युनिव्हर्सिटी अवेंन येथून विजेते तिकीट खरेदी केले' असे लिहिले आहे. लॉटरीचा निकाल हा सांताने दिलेल्या भेटवस्तूची डिलिव्हरी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

आईने ठेवलेल्या क्रिसमस स्टॉकिंगमध्ये होते लॉटरी तिकीट: २५ वर्षीय टेलर कॅफ्री यांनी स्टॉकिंगमधून तिकीट काढले तेव्हा लॉटरीचा विजय नोंदवला गेला. क्रिसमस स्टॉकिंगमध्ये हे लकी तिकीट तिच्या आईने ठेवले होते असे समजते. लोवा लॉटरी टेलरने जिंकली असून, त्याचे बक्षीस $150,000 आहे. सहसा माझी आई फॅमिली स्टॉकिंग्जमध्ये लॉटरी तिकिटे ठेवते असे तिने सांगितले.


याबाबत माध्यमांशी बोलताना टेलरने बक्षीसाच्या रकमेचा वापर कसा करणार याबद्दल सांगितले. तिच्या कॉलेज शिक्षणाचे कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन घर खरेदी करण्यासाठी ही रक्कम वापरणार असल्याचे तिने सांगितले.