Sri Lankan Man Harasses New Zealand Solo Female Traveler : न्यूझीलंडच्या एका पर्यटक तरुणीला शरीरसुखाची मागणी करण्यात आली, तिने नकार दिल्यावर धक्कादायक प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sri Lankan Man Harasses New Zealand Solo Female Traveler : परदेशी नागरिक एकट्याने प्रवास करणे ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक देशांना भेटी देऊन, तेथील पर्यटन स्थळे, खाद्यसंस्कृती आणि संस्कृतीबद्दल विशेष अनुभव घेऊन ते परततात. भारतासह आशियाई देशांमध्ये मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक येतात. काही वेळा त्यांना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागते. आता न्यूझीलंडच्या एका तरुणीने एकटीने प्रवास करताना घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. रस्त्यात प्रेमाने बोलण्याचे नाटक करणाऱ्या एका व्यक्तीने नंतर पर्यटक तरुणीला शरीरसुखाची मागणी केली. इतकेच नाही तर त्याने विकृत प्रकारही केला. ही घटना श्रीलंकेत घडली असून, हा व्हिडिओ पाहून अनेक जण संताप व्यक्त करत आहेत.
न्यूझीलंडच्या तरुणीची छेडछाड
न्यूझीलंडची तरुणी मोल्स (Mols) जगातील अनेक देशांमध्ये एकटीने प्रवास करते. ती तेथील विशेष ठिकाणे आणि खाद्यपदार्थांबद्दल तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करते. अशाच प्रकारे तिने श्रीलंकेचा प्रवास केला. यावेळी घडलेल्या घटनेबद्दल तिने सांगितले आहे. हा व्हिडिओ शेअर करावा की नाही, यावर तिने खूप विचार केला. अखेरीस, एकट्या प्रवास करणाऱ्या महिलेला सामोरे जावे लागणारी ही एक मोठी समस्या आहे आणि हे वास्तव आहे, असे सांगून तिने व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचवेळी घडलेल्या घटनेचे तिने वर्णनही केले आहे.
स्थानिक व्यक्तीचे बोलणे ऐकून पर्यटक तरुणीला धक्का
श्रीलंकेला जाऊन तिने तेथील ऑटो-रिक्षा भाड्याने घेऊन प्रवास सुरू केला. अरुगम बे ते पासिकुडा येथे जात असताना तिने आपली भाड्याची ऑटो-रिक्षा थांबवली. यावेळी स्कूटरवरून तिचा पाठलाग करणारा एक तरुण तिथे आला. भाषेच्या समस्येमुळे तरुणाशी बोलण्यात अडचण येत असली तरी, तो तरुण कसाबसा इंग्रजीत बोलत होता. हसून बोलणारा तो तरुण खूप मैत्रीपूर्ण आणि चांगला वाटला, असे तिला वाटले. बोलता-बोलता त्या श्रीलंकन तरुणाने पर्यटक तरुणीला शरीरसुखाची मागणी केली. हे शब्द ऐकून तरुणीला धक्का बसला आणि ती घाबरली.
त्या तरुणाला सडेतोड उत्तर देत न्यूझीलंडच्या तरुणीने 'नो, नो' म्हणत आपली रिक्षा सुरू केली. यावेळी त्या स्थानिक श्रीलंकन तरुणाने तिच्यासमोरच हस्तमैथुन केले. तिने वेगाने वाहन चालवत पुढे प्रवास केला. त्या स्थानिक व्यक्तीपासून सुटका झाल्यावर तरुणीने सुटकेचा निःश्वास सोडला. अखेर तिने आपल्यासोबत घडलेल्या अनुभवाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
श्रीलंका असा नाही
यावेळी तिने सांगितले की, 'सोलो ट्रॅव्हल' प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी सुंदर नसतो. अशा अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रत्येक दिवस तुमची ताकद आणि क्षमता तपासतो. या घटनेमुळे संपूर्ण श्रीलंकेचे लोक असेच आहेत, असे म्हणणे चुकीचे आहे. कारण मी अनेक श्रीलंकन स्थानिकांना भेटले आहे. सर्वांनी प्रेमाने संवाद साधला. मी चांगल्या लोकांना भेटले आहे. या एका व्यक्तीच्या कृत्यामुळे श्रीलंका असा आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असेही तरुणीने म्हटले आहे. तरुणाच्या या वागण्यावर तीव्र संताप व्यक्त होत असून, त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेकांनी केली आहे.


