airport: रॉयटर्सने जारी केलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये रियाध विमानतळाकडे जाणाऱ्या मुख्य हायवे आणि टर्मिनल इमारतींच्या मागे धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत.
रियाध: प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ शनिवारी भीषण आग आणि काळ्या धुराचे लोट उठले. रॉयटर्ससह अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी ही बातमी दिली आहे. रॉयटर्सच्या व्हिडिओमध्ये विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता आणि टर्मिनल इमारतींच्या मागे धूर येताना स्पष्ट दिसत आहे. सौदी प्रशासनाने या धुराबाबत आणि रात्री दिलेल्या अलर्टबाबत रॉयटर्सला अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
सौदी प्रशासनाने शनिवारी सकाळी परिस्थिती नियंत्रणात असल्याची घोषणा केली. पण त्याआधी रियाधमध्ये लोकांना मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले. सौदी नागरी संरक्षण विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीच राजधानी रियाध आणि पूर्वेकडील अल खर्ज भागात धोक्याचा इशारा देणारे मेसेज लोकांच्या फोनवर पाठवले होते. त्यानंतर सकाळी प्रशासनाने सर्व भाग सुरक्षित असल्याचा मेसेज पाठवला. रियाधच्या ओलाया भागात असलेल्या रॉयटर्सच्या पत्रकारानेही अलर्ट मागे घेण्यापूर्वी एक मोठा आवाज ऐकल्याचं सांगितलं.
