Precious gold : चहाच्या किमतीत सोनं! या देशातील दर ऐकून बसेल तुम्हाला धक्का...
Precious gold : भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पण, एका देशात एक ग्रॅम सोन्याची किंमत फक्त १८१ रुपये आहे. चहा-कॉफीच्या दरात सोनं मिळणाऱ्या या देशाबद्दल आणि ते भारतात आणण्याच्या कस्टम नियमांबद्दल जाणून घेऊया.

Gold Price: दुबईला विसरा... चहाच्या कपाच्या किमतीत सोनं!
भारतात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पण दुबईपेक्षाही स्वस्तात सोनं मिळणारा एक देश आहे, जिथे चहाच्या किमतीत एक ग्रॅम सोनं खरेदी करता येतं. हे ऐकायला आश्चर्य वाटेल, पण खरं आहे.
अविश्वसनीय दर
सोनं खरेदीसाठी सगळे दुबईकडे पाहतात. पण व्हेनेझुएला देशाने दुबईलाही मागे टाकले आहे. तिथे सोन्याची किंमत इतकी कमी आहे की ती एका कप चहा किंवा कॉफीच्या बरोबरीची आहे.
व्हेनेझुएलामध्ये सोनं इतकं स्वस्त का आहे?
व्हेनेझुएलामध्ये सोनं इतकं स्वस्त असण्याचं कारण म्हणजे तिथली आर्थिक संकट आणि महागाई. यामुळे तिथल्या चलनाचं मूल्य पूर्णपणे घसरलं आहे. लोक सोनं चलन म्हणून वापरत आहेत.
भारत vs व्हेनेझुएला : किमतीतील फरक
भारतात सध्या 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 13,800 रुपयांहून जास्त आहे, तर व्हेनेझुएलामध्ये ती फक्त 181.65 रुपये आहे. म्हणजेच, व्हेनेझुएलामध्ये सोनं 75 ते 80 पट स्वस्त आहे.
2026 मध्ये बदलणारे आर्थिक चित्र
दुबईत सोनं करमुक्त आहे, पण व्हेनेझुएलामध्ये आर्थिक संकटामुळे सोनं स्वस्त चलन बनलं आहे. 2026 पर्यंत व्हेनेझुएला एक नवीन गोल्ड हब म्हणून उदयास येईल, असं म्हटलं जात आहे.
व्हेनेझुएलातून भारतात सोनं आणता येतं का?
व्हेनेझुएलातून सोनं आणण्यापूर्वी कस्टम नियम जाणून घ्या. पुरुषांना २० ग्रॅम आणि महिलांना ४० ग्रॅम दागिन्यांवर सूट आहे. पण ही सूट सोन्याच्या बिस्किटांवर किंवा नाण्यांवर लागू होत नाही.

