PM Modi on Two Day Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेणार असून, त्यांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे.

PM Modi on Two Day Israel Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यासाठी रवाना होत आहेत. सकाळी नऊ वाजता ते दिल्लीतून इस्रायलसाठी निघतील. तिथे पोहोचल्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू स्वतः त्यांचं स्वागत करतील. यानंतर मोदी आणि नेतन्याहू यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

भारतीय वेळेनुसार आज रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी इस्रायलच्या पार्लमेंटला संबोधित करतील. उद्या दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेत संरक्षण आणि व्यापार क्षेत्रातील सहकार्यासाठी काही महत्त्वाच्या करारांवर सह्या केल्या जातील. स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राच्या भूमिकेचा भारत या चर्चेदरम्यान पुनरुच्चार करेल, असं सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

इस्रायलच्या विरोधी पक्षनेत्याकडून मोदींचं स्वागत

एकीकडे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यासोबतच्या मतभेदांमुळे विरोधी पक्ष मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकू शकतो अशा बातम्या येत असताना, दुसरीकडे इस्रायलचे विरोधी पक्षनेते याइर लापिड यांनी मोदींच्या दौऱ्याचं स्वागत केलं आहे. 'संपूर्ण इस्रायल पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी उत्सुक आहे,' असं लापिड यांनी 'X' (पूर्वीचं ट्विटर) वर लिहिलं आहे. मोदी हे इस्रायलचे खरे मित्र असून दोन्ही देशांमध्ये घट्ट मैत्रीचे संबंध आहेत, असंही लापिड म्हणाले. विशेष म्हणजे, याआधी लापिड यांनीच भाषणावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मोदींचं भाषण ऐकण्यासाठी नेतन्याहू यांनी सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना आमंत्रित न केल्यामुळे त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.